बायजीपुऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांना अटक, जिन्सी पोलिसांची कारवाई

सुषेन जाधव
Wednesday, 16 September 2020

सलग दुसऱ्या दिवशी कारवाई : ९ जण ताब्यात, रोख रकमेसह ७१ हजाराचा ऐवज जप्त

औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुऱ्यात अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत जिन्सी पोलिसांनी मंगळवारी (ता.१५) रात्री ९ जणांना ताब्यात घेत रोख रकमेसह ७१ हजार ९२० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. अटकेतील संशयितांमध्ये रिक्षाचालक, टपरीचालकाचा समावेश आहे. कालच उस्मानपुरा पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जुगारींना अटक केली होती. तोच दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१५) पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे यांना इंदिरानगर परिसरातील बायजीपुरा गट क्र.२१ मध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी पथकासह छापा टाकला. या छाप्यात फेरोज खान चाँद खान पठाण (वय ४३, रिक्षाचालक), शेख युनुस शेख मन्नु (५०, पानटपरी चालक), सुजाओद्दीन बसरोद्दीन इनामदार (५२), शेख शकील शेख, शेख कलीम शेख कय्युम (५६), शेख रफीक शेख शरीफ (५२), शेख गफ्फार शेख रज्जाक (६०, सर्व रा. इंदिरानगर), शेख तसलीम शेख लाला (४८, रा. पटेलनगर, नारेगाव), सय्यद मुनिर सय्यद बशीर (५२, हॉटेलचालक, मिसारवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह ७१ हजार ९२० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई रफी शेख, पोलीस हवालदार हारुण शेख, पोलीस नाईक संजय गावंडे, पोलीस शिपाई सुनील जाधव, गणेश नागरे, प्रविण टेकल, होमगार्ड शेख बासीत यांनी केली.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Raid on gambling den