esakal | प्रभू रामांविषयी श्रद्धा असावी, त्यांच्या नावाने राजकारण नको : सेनानेते खैरे
sakal

बोलून बातमी शोधा

khaire.jpg


कारसेवक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भावना 

प्रभू रामांविषयी श्रद्धा असावी, त्यांच्या नावाने राजकारण नको : सेनानेते खैरे

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : प्रभू रामांविषयी श्रद्धा असली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाने राजकारण केले जाऊ नये. अयोध्येत राममंदिराच्या कामाला सुरुवात झाली आणि कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले. शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिर बांधण्याची घोषणा केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि मंदिराच्या कामाला सुरुवात झाली, हा शिवसेनेचा विजय असल्याचे मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

अयोध्येत कारसेवेत औरंगाबादमधून खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गेले होते, त्यापैकीच एक असलेले शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. बुधवारी (ता.पाच) अयोध्येत राममंदिराच्या निर्माण कार्यासाठी भूमिपूजन सोहळा झाला. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने राममंदिरामध्ये पूजन केले. श्री. खैरे यांनी त्यांच्या निवासस्थानीच प्रभू रामचंद्रांचे पूजन केले.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना कारसेवा करा असे आदेश देताच, त्यानुसार आम्ही सर्व आमदार सहभागी झालो होतो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी सर्व ठिकाणचे शिवसैनिक मोठ्या संख्येने कारसेवेत सहभागी झाले होते. औरंगाबादमधून माझ्यासोबत नगरसेवक गिरजाराम हळनोर, सतीश कटकटे, बापू जहागीरदार असे अनेकजण होते. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
अयोध्येमध्ये वादग्रस्त ढाचा उद्ध्वस्त करून रामजन्मभूमी मुक्त केल्यानंतर तेथील दगड, माती, विटा, मलबा हटवण्याचे काम माझ्यासह सर्वांनी केले. सध्या तिथे रामलल्लाची जी मूर्ती आहे ती आम्ही सर्वांनी मिळून तिथे बसवली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की त्या मूर्तीला माझा हात लागलेला आहे. राममंदिराच्या निर्माण कार्याला लवकर सुरुवात व्हावी यासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये उत्तर प्रदेश शिवसेनेतर्फे अयोध्येत तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध लादले असतानादेखील आम्ही तिथे रामभक्तांचा यशस्वीपणे मेळावा घेतला होता.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा    
पुढे श्री. खैरे म्हणाले, की अयोध्या आंदोलनात शिवसेनेचा सर्वात जास्त सहभाग होता. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिर व्हावे यासाठी अयोध्येला भेट दिली, घोषणा केली तेव्हा कुठे हालचालींनी वेग घेतला आणि राममंदिराच्या बांधकामासाठी आता सुरुवात झाली. यामुळे हा शिवसेनेचा विजय आहे. आज कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  


संपादन-प्रताप अवचार