या कारणामुळे येते मासिक पाळीत अनियमितता, पाळी नियमितत होण्यासाठी हे करा  उपाय 

File Photo
File Photo

औरंगाबाद ः मासिक पाळी ही लपविण्याची बाब नाही. आईने मुलींना योग्य माहिती द्यायला हवी. मुलींच्या प्रश्नांचे निराकरण करून त्यांचा ताणतणाव कमी करावा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसानिमित्त सांगितले.

मासिक पाळी हा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्याकडे अनेकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु त्याला लागून अनेक रूढी परंपरा आहेत. मासिक पाळी बाबत मुलींना व्यवस्थित समजावून सांगितल्यास त्यांचे समज-गैरसमज आणि अज्ञान दूर होईल. मासिक पाळी बद्दल माहिती नसल्यास मुली त्रस्त होतात.

अनेक मुली डॉक्टरांकडे तपासणीसाठी येतात; तेव्हा बहुतांश मुलींना मासिक पाळी बाबत ज्ञान नसते. मासिक पाळी चुकली म्हणजे गर्भधारणा झाली असा समज होतो. 


हे असू द्या लक्षात 

  • अनेकवेळा घरातले कपडे मासिक पाळीदरम्यान वापरले जातात, ते वापरू नये. 
  • असे कपडे अनहायजेनिक आहेत. या कपड्यांचा संसर्ग होऊ शकतो. 
  • कपड्याऐवजी पॅड वापरायला हवेत, ते हायजेनिक असतात. 
  • मासिक पाळी येणे म्हणजे शरीरातील घाण निघून जाते, हा समज चुकीचा आहे. 
  • शरीरावरील त्वचा एका सायकलमधून निघून जाते; तसेच मासिक पाळीने गर्भाशयातील आवरण दर महिन्याला निघते हे स्वाभाविक आहे. 
  • याचा ताण घ्यायला नको. ही प्रक्रिया समजून घेतली तर मूड बदलण्याची क्रिया, चिडचिडेपणा टाळता येतो. 
  • मासिक पाळी चुकली म्हणजे गर्भधारणा झाली असा एक समज आहे. 

अनियमित मासिक पाळीची कारणे 

  • ताणतणाव आणि अनियमित मासिक पाळीचा संबंध आहे. 
  • परीक्षा, जॉब, वर्कलोड, पाळी येते की नाही याची चिंता. यामुळे हार्मोनल इनबॅलन्स होते. वजन वाढून चेहऱ्यावर परिणाम जाणवतो. 
  • ॲनेमिया असणे. 
  • पाळी एक-दीड महिना उशिरा आली, की मग ही सायकल तशीच तयार होऊन जाते. 

हे बदल करा.. सल्लाही महत्त्वपूर्ण.. 

  • सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. 
  • जीवनपद्धतीत बदल करावा. 
  • वजन नियंत्रणात ठेवावे, मॉर्निंग वॉक. 
  • समतोल आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थाचे सेवन करावे. 
  • रक्तवाढीसाठी गोळ्या जरी घेतल्या नाही तरी शेंगदाणे, गूळ, चिक्की, पेंडखजूर हे पदार्थ आवर्जून खावे. 
  • जंक फूड नकोच. वडापाव, पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे. 
  • योग्य उपचार व पथ्य पाळून सहा महिन्यांत पाळी नियमित करता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com