चिंताजनक ः औरंगाबादेत दरदिवशी सरासरी एवढे रुग्ण कोरोनाबाधित! 

Tuesday, 5 May 2020

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. असे असले तरी मात्र ज्या भागांमध्ये फैलाव होत आहे, त्या भागात नंतर हळूहळू अधिक रुग्ण सापडत आहेत. अर्थातच नागरिक एकमेकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण पहिल्या ४२ दिवसांपेक्षा नंतरच्या नऊ दिवसांमध्ये जास्त वाढले आहे.

औरंगाबाद : शहरात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, गेल्या नऊ दिवसांमध्ये तब्बल २६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या नऊ दिवसांचा सरासरी विचार केल्यास दरदिवशी ३० रुग्णांना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. 

एकीकडे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कोविड चाचणी वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा केला आहे. विशेषतः ज्यांच्याशी संसर्ग झालेला आहे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोधही पटकन घेण्यात येत आहे, असा महापालिकेचा दावा आहे.

यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. असे असले तरी मात्र ज्या भागांमध्ये फैलाव होत आहे, त्या भागात नंतर हळूहळू अधिक रुग्ण सापडत आहेत. अर्थातच नागरिक एकमेकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण पहिल्या ४२ दिवसांपेक्षा नंतरच्या नऊ दिवसांमध्ये जास्त वाढले आहे. यात काही चुकाही प्रशासन, घाटी रुग्णालयाकडून झाल्याचे दिसून येते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

दर दोन-तीन दिवसांत 

वाढले पन्नास रुग्ण 
साधारणतः विचार केल्यास पहिले ५३ रुग्ण ४२ दिवसांत बाधित झाले. दुसरे व तिसरे ५० रुग्ण तीन दिवसांत, चौथे आणि पाचवे ५० रुग्ण बाधित होण्यासाठी दोन दिवस कालावधी लागला. तर नंतरचे ६८ रुग्ण तीन दिवसांमध्ये बाधित झाले आहेत. असे एकुण ३२१ रुग्ण बाधित झाले आहेत. 

आकडे बोलतात 

 • १५ मार्च ते २६ एप्रिलपर्यंत दरदिवशी १.२६ रुग्ण आढळत होते. 
 • २७ एप्रिल ते ५ मेपर्यंत दरदिवशी २९.७७ रुग्ण आढळत होते. 
 • १५ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 
 • आठ दिवसांत २३.६३ पट रुग्णवाढीचा दर आहे. 
 • २७ एप्रिल ते ४ मे या आठ दिवसांत असे वाढले रुग्ण 

तारीख (कंसात दरदिवशी वाढलेले रुग्ण) 

 • २७ एप्रिल  (२९) 
 • २८ एप्रिल  (२७) 
 • २९ एप्रिल  (२१) 
 • ३० एप्रिल  (४७) 
 • १ मे         (३९) 
 • २ मे         (४१) 
 • ३ मे         (२६) 
 • ४ मे         (१४) (४ मे सायंकाळी सातपर्यंत) 
 • ५ मे         (२४)
 • (एकूण ः २६८) 

(४२ दिवसांतील बाधित ५३ असे एकूण ३२१ रुग्ण) 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Worrying Aurangabad Average 30 patients corona every day