नदी पुलाखाली "ती' रडत होती जीवाच्या आकांताने 

औरंगाबाद : सुखना नदीतील पुलाखाली जन्मदात्यांनी टाकून दिलेली हीच ती नकोशी.
औरंगाबाद : सुखना नदीतील पुलाखाली जन्मदात्यांनी टाकून दिलेली हीच ती नकोशी.

औरंगाबाद - सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या मोबाईल 2 मधून सहाय्यक फौजदार सिद्धार्थ शिंदे 19 डिसेंबर रोजी गस्त घालत असताना. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षातून संदेश प्राप्त झाला की, मोबाईलसह तातडीने झाल्टा फाटा येथे जा. त्याप्रमाणे तेतिथे दाखल झाले असता, सुखना नदीच्या पुलाखाली साधारणत: स्थानिक तीन चार महिला घोळका करुन थांबल्या होत्या. त्यांच्याजवळच एक 20 ते 25 दिवसाची नकोशी चिमुकली जीवाच्या आकांताने रडत होती. या चिमुकलीच्या पालकांचा पोलिस आणि साकार च्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात येत आहे. 
बाल कल्याण समितीच्या आदेशाने निराधार मुलांचे संगोपन करणे, त्यांच्या पालकांचा शोध घेणे आणि त्यांना ते सुपूर्द करणे. जर पालक सापडले नाहीत तर त्या बालकांचे संगोपन करतानाच त्यांना दत्तक देण्याबाबतची प्रक्रिया करण्याचे काम साकार (सोसायटी फॉर ऍडॉप्शन नॉलेज अवेरनेस ऍण्ड रिसोर्सेस) संस्थेमार्फत केले जाते.

शहरापासून जवळच असलेल्या चिकलठाणा परिसरापासून काही अंतरावर असलेल्या सुंदरवाडी येथील सुखना नदीच्यापुलाखाली सापडलेल्या त्या बालिकेविषयी माहिती दिल्यानतंर मोबाईल टू च्या पोलिसांनी पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर तिथे दाखल झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला उचलून घेतले आणि घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरुपात त्या बालिकेला 20 डिसेंबर रोजी साकार संस्थेकडे संगोपनासाठी देण्यात आले आहे. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशीच तीला टाकले 

दुसरी घटना कन्नड तालूक्‍यातील. नववर्षाच्या आगमनानंतर झालेल्या स्वागताच्या जल्लोषानंतर हॉटेल, ढाबेचालकही चांगला व्यवसाय झाल्याने आनंदीत होते. कन्नड ते चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 52 जवळ भांबरवाडी गाव आहे. या गावाच्या पुढे हॉटेल सुरुची फॅमिली रेस्टॉरंट भाउंचा ढाबा आहे. हॉटेल मालकाने पोलिसांना सांगीतले की, बुधवारी (ता.एक) रात्री साडे आठ नउ वाजेच्या सुमारास एक क्रुझर वाहन ढाब्यासमोर येवून थांबले. त्यात दोन तीन महिला आणि दोन तीन पुरुष होते, वाहन ढाब्यासमोरुन बाजूला काढण्यास सांगीतले असता त्यापैकी एकाने क्रुझरमध्ये डिलिवरीचा पेशंट आहे. त्यामुळे हॉटेलत परत जाउन कामाला लागलो. 

काही वेळातच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने बाहेर आलो असता नुकतेच जन्मलेले एक स्त्री जातीचे . जीवंत अर्भक तिथे उघडयावर टाकून दिल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या नवजात अर्भकाला घाटी रुग्णायलयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर जिल्हा बाल कल्याण समितीच्या आदेशाने साकार संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

या दोन्ही बालिकांचा सांभाळ करण्याची इच्छा असल्यास तीच्या नैसर्गिक पालकांनी 30 दिवसाच्या आत साकार संस्थेच्या अजमेरा कॉम्पलेक्‍स, प्लॉट नंबर 177,ज्योतीनगर मेन रोड, ज्योतीनगर औरंगाबाद या पत्त्यावर किंवा 0240 - 2347099 किंवा 9673101760 या क्रमांकावर संपर्क करावा. अन्यथा मुदतीनंतर साकार संस्थेतर्फे या बालिकेचे कायदेशीर पुनर्वसन करण्यात येईल असे कळवण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com