
अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल.जी. गायकवाड विराजमान झाल्याने विरोधी पक्षात कोण बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण ?
औरंगाबाद - जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या मीना शेळके अध्यक्षपदी निवडल्या गेल्या तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल.जी. गायकवाड यांची निवड झाली आहे. मात्र आता विरोधी पक्षात कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीनंतरच आता विरोधी पक्षात कोण हे स्पष्ट होईल.
यापुर्वी राज्यात शिवसेना भाजप युती मात्र जिल्हा परिषदेत शिवसेना, कॉंग्रेस अशी आघाडी होती. आता तर राज्यात महाविकास आघाडी झाली असल्याने जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी कायम राहील आणि शिवसेनेचा सहज अध्यक्ष होईल अशा राजकीय चर्चा सुरु होत्या. मात्र शिवसेनेच्याच सदस्य असलेल्या आणि गेली अडीच तीन वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी केली.
श्रीमती डोणगावकर यांनी पुर्वीचे कॉंग्रेसचे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबतच शिवबंधन बांधलेल्या सहा सत्तार समर्थक आणि भाजपशी हातमिळवणी करुन मी पुन्हा अध्यक्ष होणार म्हणत महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके यांच्या विरोधात मैदानात उभ्या राहिल्या. गेली दोन अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचे सदस्य जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या आसनात बसत होते. त्या भाजपची श्रीमती डोणगावकर यांनी मदत घेतली.
असे का घडले : तीन प्रकारचे इंजेक्शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्टरची आत्महत्या
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली आणि महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक मत आणि अपक्षाचे एक अशी दोन मते फुटल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान प्रत्येकी 30 पडलेली मते उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपचे एल.जी. गायकवाड यांच्या पारड्यात पडले ते विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या शुभांगी काजे यांचा पराभव झाला. आता अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल.जी. गायकवाड विराजमान झाल्याने विरोधी पक्षात कोण बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जाणून घ्या : विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्याने रस्ता रोको....वाचा कुठे
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि वित्त व बांधकाम समिती या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया करण्याविषयी आठवडाभरात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा परिषदेत संमीश्र वातावरण असल्याने विरोधी पक्षात कोण हा पेच निर्माण झाला असला तरी विषय समिती सभापतींची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षात कोण बसणार हे स्पष्ट होईल असे सुत्रांनी सांगीतले.
.......
Web Title: Aurangabad Zilla Parishad who Now Opposition Parti
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..