esakal | बाप रे बाप..! अडीच तासात औरंगाबाद शहर गेले पाण्यात; सुखना, खाम नदीला पूर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

बुधवारी मध्यरात्री बाराच्यानंतर पावसाला सुरुवात झाली व जोर एवढा वाढला की, शहरातील अनेक भागातील नागरिकांची झोप उडाली. सुमारे अडीच ते तीन तासात ५६.२ एवढा पाऊस झाला.

बाप रे बाप..! अडीच तासात औरंगाबाद शहर गेले पाण्यात; सुखना, खाम नदीला पूर

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहर व परिसराला बुधवारच्या रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे अडीच ते तीन तासात तब्बल ५६.२ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पार्किंगच्या जागा, घरात पाणी शिरून दाणादाण उडाली. सुखना व खाम नदींना पूर आला. अनेकांनी मदतीसाठी अग्निशमन विभागाला पाचारण केले. गुरुवारी (ता. २५) दुपारपर्यंत अग्निशमन विभागाचे मदतकार्य सुरूच होते.

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या. 

मृग नक्षत्रापासून चांगली सुरुवात केलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उसंत घेतली होती. त्यामुळे प्रचंड उकाडा वाढला होता. त्यात बुधवारी मध्यरात्री बाराच्यानंतर पावसाला सुरुवात झाली व जोर एवढा वाढला की, शहरातील अनेक भागातील नागरिकांची झोप उडाली. सुमारे अडीच ते तीन तासात ५६.२ एवढा पाऊस झाला.

त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला. नाल्याकाठी असलेल्या शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले. अनेकांनी अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी फोन केले. पहिला फोन पहाटे पावणे तीन वाजता आला. त्यानंतर सुमारे सकाळपर्यंत २० ते २५ जणांचे फोन आले. अग्निशमन विभागाने तातडीने मदतीसाठी गाड्या रवाना करून मदतकार्य सुरू केले.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

रात्री पावणे तीन वाजता मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरात असलेल्या महापालिकेच्या निवासस्थानातून घरात पाणी शिरल्याची तक्रार करण्यात आली. दरम्यान सिडको एन-१२ भागातील खासदार इम्तियाज जलील यांच्या घरा शेजारी असलेल्या एका शाळेत पावसाचे पाणी शिरल्याबद्दल अग्निशमन दलाला फोन आला. 
सिडको एन-९ श्रीकृष्णनगर, सिडको एन-९ सप्तश्रृंगी सोसायटी याभागातील घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

आरेफ कॉलनीमधील मशिदीच्या समोरील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना तारांबळ उडाली. नागेश्वरवाडी येथील नाल्याला पूर आल्यामुळे नाल्या काठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. फाजलपुरा भागात देखील नाल्या काठच्या घरांमध्ये पाणी शिरले. किलेअर्क येथे पन्नास पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरले. बुढीलेन, बंजाराकॉलनी गल्ली क्रमांक-१ येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. कबाडीपुरा, बारुदगर नाला या परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. सिडको एन-६ भागातील मरिमाता मंदिर देखील पाण्यात बुडाले होते. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

जयभवानीनगरात पाण्यात 
बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे जयभवानीनगरवसीयांचे प्रचंड हाल झाले. या भागातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले तर मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. नागरिकांनी एकमेकांना सावरत घरात साचलेले पाणी बाहेर काढले व रात्र जागून काढली. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

आरोग्य केंद्रात पाणी शिरले 
जुना बाजार, कबाडीपुरा येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात पावसाचे पाणी शिरले. सकाळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी कामावर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. कर्मचाऱ्यांनी चिखलातच आपले काम सुरु केले. येथे आलेल्या नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

सुखना नदीवरील पूल खचला 
या पावसामुळे शहर परिसरातून वाहणाऱ्या सुखना आणि खाम नद्यांना पूर आले. सुखना नदीवर गेल्या वर्षी बांधलेले पूल देखील खचल्याचे सकाळी समोर आले. 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

भिंत पडल्याने रिक्षा दबली 
सिटीचौक पोलिस ठाण्याच्या मागे भिंत कोसळून रिक्षाचे नुकसान झाले. सिराज सय्यद यांची रिक्षा मलब्याखाली आल्याने ती दबल्या गेली. तसेच एक घर व गॅरेजचे देखील नुकसान झाले. फाजलपुरा येथे रणसिंगे यांच्या घरात पाणी शिरले. मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुजीत कल्याणकर, संग्राम मोरे, शशिकांत गिते, शेख रशिद यांनी मदतकार्य केले.