मराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली

मधुकर कांबळे
Wednesday, 2 December 2020

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वात जास्त मतदान परभणी जिल्ह्यात झाले तर सर्वात कमी बीड जिल्हात झाले आहे.पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या अंती आकडेवारीनुसार ३ लाख ७३ हजार १६६ मतदारांपैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये १ लाख ९५ हजार ६११ पुरूष तर ४५ हजार १८२ महिलांचा समावेश आहे, याशिवाय अन्य ३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विभागीय आयुक्तालयातुन प्राप्त अंतीम आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात एकुण १०६३७९ मतदारांपैकी ६७१९४ जणांनी मतदान केले. जालना जिल्ह्यात २९७६५ मतदारांपैकी १९७८८ जणांनी मतदान केले. परभणी जिल्ह्यात ३२७१५ मतदारांपैकी २२०६२ जणांनी मतदान केले. हिंगोली जिल्ह्यात १६७६४ मतदारांपैकी १०९९४ जणांनी मतदान केले. नांदेड जिल्ह्यात ४९२८५ मतदारांपैकी ३१५९५ जणांनी मतदान केले. लातूर जिल्ह्यात ४११९० मतदारांपैकी २७२६० जणांनी मतदान केले. उस्मानाबाद जिल्ह्यात ३३६३२ मतदारांपैकी २२५२३ जणांनी मतदान केले तर बीड जिल्ह्यात ६३४३६ मतदारांपैकी ३९३८० जणांनी मतदान केले.

जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी
० परभणी : ६७.४४ टक्के
० उस्मानाबाद : ६६.९७ टक्के
० जालना : ६६.४८ टक्के
० लातुर : ६६.१८ टक्के
० हिंगोली : ६५.५८ टक्के
० नांदेड : ६४.११ टक्के
० औरंगाबाद : ६३.१६ टक्के
० बीड : ६२.०८ टक्के

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aurangabad Region 64.53 Percent Voting Aurangabad News