Corona शिवसेना घाटीतील कोरोनायोद्ध्यांच्या पाठीशी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे  मात्र शिवसेना डॉक्टरांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.

औरंगाबाद : घाटीतील कोरोनायोद्ध्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता रूग्णसेवा करत कोरोनाशी लढण्याचे कार्य करत राहावे. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. शिवसेना आमदारांनी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची भेट घेऊन त्यांना ग्वाही दिली. 

काही दिवसांपुर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औषधीच्या मुद्द्यावरून घाटी प्रशासनावर टिका केली होते. या पार्श्वभुमीवर मंगाळवारी (ता.30) शिवसेनेच्या आमदारांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णायला  (घाटी) येथे प्रशासनाची भेट घेतली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी अधिष्ठीता डॉ. कानन येळीकर यांच्यासोबत बैठक घेवुन घाटीमधील अडीअडचणी जाणुन घेतल्या. घाटीमध्ये काही संघटना बाहेरच्या स्वयंसेवी संस्थां, संघटनेच्या नावाखाली घाटी परिसरात येऊन त्रास देत आहेत. या पार्श्‍वभुमीवर बुधावारी (ता.एक) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेणार असल्याचे यावेळी अधिष्ठाता डॉ. येळीकर यांना सांगण्यात आले. घाटीमध्ये यंत्रसामुग्रीसाठी ३१ कोटीचा निधी देण्याची मागणी असून यासाठी शिवसेना आमदार शासन दरबारी आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भुमिका मांडणार असल्याचे सांगीतले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घाटीमधील डॉक्टर, नर्स व कर्मचारी प्रामाणिकपणे कोराना या सारख्या संसर्गजन्य रोगाशी लढुन रुग्णसेवा करत आहे अश्यावेळी आपण सर्वांनी मिळून त्यांना धीर दिला पाहिजे. मराठवाड्यातील महत्वाचे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीमध्ये डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे पण मात्र शिवसेना डॉक्टरांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. घाटीमध्ये बाहेरुन औषधी मागवले जातात किंवा पेशेंटची व्यवस्थित उपचार होत नाही असा तक्रारारीचा सुर असून मात्र वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला पाहणे गरजेचे होते म्हणुन आम्ही सर्व आमदार महोदयांनी आज शासकिय हॉस्पिटल (घाटी) येथे बैठक घेतली. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

घाटीतील डॉक्टर लोक प्रामाणिकपणे व जीवापाड काम करत असुन त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करु नये व कोरोनाच्या संकटामध्ये इतरांना साथ देणे आपले काम आहे. कोणाच्या ही दबावाला बळी न पडता रुग्णसेवा करा आम्ही तुमच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत असे आश्‍वस्त केल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगीतले. 

 

घाटी रूग्णालयात गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवक , कर्मचारी सर्वजन खूप चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवण्याची या काळात खरी गरज आहे. मात्र काही जण त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम छोट्या छोट्या गोष्टीवरून करत आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढवण्याची खरी गरज आहे . यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी घाटी प्रशासनाच्या प्रमुखांशी चर्चा करून आढावा घेतला आहे. शिवसेना या कोरोनायोद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 
 अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Shivsena With Corona Warriors