औरंगाबाद स्मार्ट सिटीचे कार्यालय आता २१ कोटींच्या जागेत 

माधव इतबारे
Saturday, 29 August 2020

संशोधन केंद्राशेजारील जागा महापालिकेने केली अंतिम 

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला आता हक्काची जागा मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या शेजारी असलेली इमारत महापालिकेने त्यासाठी अंतिम केली आहे. या जागेची किंमत २१ कोटींच्या घरात असून, स्मार्ट सिटी योजनेच्या विकासकामातील महापालिकेचा हिस्सा म्हणून ही रक्कम गृहीत धरावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या जिवंत समाधीची अफवा; भक्तिस्थळांवर भाविकांची गर्दी  
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी या महत्त्वपूर्ण योजनेत औरंगाबाद शहराचा पाच वर्षांपूर्वी समावेश करण्यात आला होता. त्यानंतर शासनाच्या आदेशाने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली व केंद्र आणि राज्य सरकारने या कंपनीला विविध प्रकल्पांसाठी २९१ कोटींचा निधी दिला. स्मार्ट सिटीचे कामकाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीमधून चालत होते. आतापर्यंतच्या संचालक मंडळाच्या बैठका याच इमारतीत घेण्यात आल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या इमारतीशेजारीच छोट्या जागेत स्मार्ट सिटीसाठीची वॉररूम तयार करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी येथून सध्या कामकाज करतात. मात्र स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कार्यालयाची चाचपणी सुरू होती. त्यानुसार संशोधन केंद्राच्या शेजारी अनेक वर्षांपासून पडून असलेली इमारत देण्याचा प्रस्ताव प्रशासक आस्तितकुमार पांडेय यांनी घेतला आहे. सुमारे २१ कोटी रुपयांची जागा असून, महापालिकेला स्मार्ट सिटीसाठी जो हिस्सा द्यावा लागतो, त्यात ही २१ कोटींची रक्कम गृहीत धरण्यात यावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

 गणरायाला निरोप देण्यासाठी लातूर प्रशासनाचा नवीन पॅटर्न !

आहे त्या स्थितीत देणार ताबा 
यासंदर्भात शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून ही इमारत वापराविना धूळखात पडून होती. स्मार्ट सिटीच्या कार्यालयाला ती आहे त्या स्थितीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edit By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Smart City office Now space 21 crores