गणरायाला निरोप देण्यासाठी लातूर प्रशासनाचा नवीन पॅटर्न ! 

gansh.jpg
gansh.jpg

लातूर : गेल्या वर्षी पाणी नसल्याने मुर्ती दान करण्याचा पॅटर्न राबवणाऱया लातूरकरांना यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे गणरायाचे घरातच विसर्जन करण्याचा पॅटर्न करून दाखवावा लागणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्नही सुरु केले आहेत. त्यात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव झाला नाही. त्यात विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे विसर्जनाचा जल्लोषही असणार नाही. त्यात शहरातील पाचही ठिकाणे जिल्हाधिकाऱयांनी गेल्याच वर्षी पाण्यासाठी आरक्षीत केल्याने यावर्षी घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे घरातच विसर्जन करावे लागणार आहे.

गेल्या वर्षी लातूरला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. गणरायाचे विसर्जन करण्य़ा इतके पाणी देखील शहरातील सिद्धेश्वर मंदिराचा बारव, गोरक्षणाची विहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाची विहिर, पापविनाश मंदिराचे बारव, शासकीय वसाहतीतील विहिरीत नव्हते. तसेच परिसरातील मांजरा व तावरजा नदीचे पात्रही कोरडे होते. याचा परिणाम गणेश विसर्जनावर झाला होता. यातून प्रशासनाने मुर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. लातूरकरांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. सुमारे २९ हजार गणेश मुर्ती लातूरकरांनी दान करीत राज्यात एक पॅटर्न निर्माण केला होता.

यावर्षी पाऊस बरा आहे. थोडे पाणीही आहे. पण कोरोनाचे संकट मात्र मोठे आहे. याचा परिणाम या उत्सवावर झाला आहे. सार्वजनिक उत्सव साजरा करण्यावर बंधने आली. त्यामुळे पन्नास टक्के गणेश मंडळानी गणरायाची स्थापनाच केली नाही. तर अनेकांनी पदाधिकाऱयाच्या घरातच गणरायाला विराजमान केले. गौरींचा सण संपल्याने आता गणरायाच्या विसर्जनाची तयारी सुरु आहे. या करीता प्रशासन बैठका घेवून नियोजन करीत आहे. यावर्षीही कोरोनाचे संकट असल्याने मिरवणुकीवर बंदी आहे. त्यात शहरातील पाचही विसर्जनाची ठिकाणी पिण्यासाठी आरक्षीत असल्याने तेथे विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे लातूरकराना आपल्या घरातच गणरायाचे विसर्जन करून आणखी एक पॅटर्न तयार करण्याची संधी आहे. यातून कोरोनाच्या प्रादूर्भाव वाढीवर मात करण्यासाठीही मदत होणार आहे.

कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी रस्त्यावर येवून गर्दी करणे अपेक्षीत नाही. त्याला बंदीही आहे. शहरातील विसर्जनाची ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी गेल्याच वर्षी आरक्षीत आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या गणरायाचे घरातच मनोभावे विसर्जन करून महापालिका प्रशासनला सहकार्य करावे.
देविदास टेकाळे, आयुक्त, महापालिका.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com