औरंगाबाद : व्यापाऱ्याला लुटले; फिर्यादी टेम्पोचालकच निघाला दरोडेखोर..!  

अनिल जमधडे 
Wednesday, 22 July 2020

टेम्पो आडवून दीड लाख रुपये पळवणाऱ्या दरोडेखोराच्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे टेम्पोचालकानेच दरोडेखोरांशी हातमिळवणी करुन दीड लाख रुपये पळवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तीघांना अटक करुन ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

औरंगाबाद : टेम्पो आडवून दीड लाख रुपये पळवणाऱ्या दरोडेखोराच्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे टेम्पोचालकानेच दरोडेखोरांशी हातमिळवणी करुन दीड लाख रुपये पळवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तीघांना अटक करुन ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

प्रकाश ढोले (रा. रास्ते सुरेगांव, ता. येवला) हा महिंद्रा पिकअप व्हॅनचा (क्र. एमएच-१७-बीडी-३०९५) चालक आहे. त्याने राहता येथील ईलेक्ट्रीक साहित्यांचे व्यापारी जितेन पटेल यांच्या इलेक्ट्रीक आँर्डरप्रमाणे इलेक्ट्रीक मोटारी बुलढाणा येथे पोहचवण्यासाठी २० जुलै रोजी चालक प्रकाश ढोले व श्री. पटेल यांचा साला रवीशेठ हे असे दोघेजण गेले होते.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

बुलढाणा येथे माल देऊन परत येताना रात्री आठ वाजेच्या सुमारास वैजापूर मार्गे राहता जाताना लाल रंगाच्या दुचाकीवरून तीघेजण आले. टेम्पोच्या समोर दुचाकी आडवी लावत तुम्ही अपघात करुन आले असे दरडावत रवी यांच्याजवळील दीड लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. ग्रामिण पोलिसांनी चालक ढोले व रवि यांची वेगवेगळी चौकशी केली. ढोले हा काहीतरी लपवत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दरोड्याची कबुली दिली. यातील मुख्य फरार आरोपी सुनील रहाणे याने ढोलेला मोठे भाडे घेऊन जाताना सांग तुलाही वाटा देईल असे अमिष दाखवले होते. त्यामुळे ढोले याने दिलेल्या माहीतीवरुन हा दरोडा टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

पोलिसांनी ढोलेसह त्याचे साथीदार संदीप राजपूत (रा. दत्तनगर, शिर्डी), अमोल मकासरे (रा. पानमळा, शिर्डी) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख ३७ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा अद्याप मुख्य आरोपी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक भागवत फुंदे, उपनिरिक्षक संदीप सोळंके, भगतसिंग दुलत, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, रमेश अपसनवाड, वाल्मीक निकम, योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, उमेश बकले, जिवन घोलप यांनी अवघ्या चोवीस तासात दरोडा उघडकीस आणला.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

( संपादन : प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Tempo driver is robber