esakal | औरंगाबादेत आज उच्चांकी ३७९ जण पॉझिटिव्ह!, सहा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ४४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांपैकी ५ हजार ४९९ रुग्ण बरे झाले आहेत. ३७० जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५७५ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आज जिल्ह्यातील १४४ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात शहरातील १३२ व ग्रामीण भागातील १२ जणांना सुटी देण्यात आली. 

औरंगाबादेत आज उच्चांकी ३७९ जण पॉझिटिव्ह!, सहा मृत्यू 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा कहर वाढताच असुन साखळी तोडण्याचे आव्हानही औरंगाबादकर व प्रशासनासमोर आहे. संसर्गाचा वेगही कमी होताना दिसुन येत नसुन आज (ता. १५) तब्बल ३७९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरातील २९४ व ग्रामीण भागातील ८५ जणांचा समावेश आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ४४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांपैकी ५ हजार ४९९ रुग्ण बरे झाले आहेत. ३७० जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५७५ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आज जिल्ह्यातील १४४ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात शहरातील १३२ व ग्रामीण भागातील १२ जणांना सुटी देण्यात आली. 


कोरोना मीटर 

बरे झालेले रुग्ण          - ५४९९ 
उपचार घेणारे रुग्ण      - ३५७५ 
एकूण मृत्यू                  -  ३७० 
------------------------------- 
आतापर्यंत एकूण बाधित - ९४४४ 
------------------------------- 

आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू 

औरंगाबादेत शहरातील पाच व सिल्लोड येथील एका रुग्णाचा कोरोना व इतर व्याधींनी मृत्यू झाला. यात पाच पुरुष व एक महिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकुण ३७० जणांचा बळी गेला आहे. 

पॉवर लूम, चिकलठाणा येथील ४५ वर्षीय पुरूषाला घाटी रुग्णालयात २३ जूनला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २५ जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा १४ जुलैला रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी क्वार्टर) परिसरातील ७० वर्षीय पुरूषाला घाटी रुग्णालयात ७ जूलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला. त्यांचा १४ जुलैला रात्री साडे दहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना मधुमेह होता. 

हेही वाचा-  शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूषाला घाटी रुग्णालयात ४ जूलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ५ जूलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा १४ जुलैला मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता. अंगुरीबाग येथील ५३ वर्षीय पुरूषाला घाटी रुग्णालयात २४ जूनला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २५ जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा १५ जुलैला दुपारी बारा वाजुन चाळीस मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह होता.

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

एका खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगर येथील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एका खासगी रुग्णालयात ६३ वर्षीय कोरोनाबाधीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचा-  लाईट जाताच येथे साधा बिनधास्त संपर्क

हेही वाचा-  वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू