esakal | Aurangabad: विद्यापीठ सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad university

विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत बुधवारी विद्यापीठात दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

Aurangabad: विद्यापीठ सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ चालू करण्याचे निर्देश दिले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणताच निर्णय घेत नाही. यामुळे विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत बुधवारी विद्यापीठात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी रात्री नऊ वाजता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले.

विद्यापीठातील ऑनलाइन शिक्षण बंद करून वर्ग भरवण्यात यावेत. मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावेत, ग्रंथालय सुरू करण्यात यावे, यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन दुपारी बारा वाजता सुरू करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांना विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेवून नंतर कळवू, अशी भूमिका घेतली. मात्र, त्यांनी लेखी देण्यास नकार दिल्याचे विद्यार्थी संघटनांनी कळविले.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

जोपर्यंत लेखी स्वरुपात काही कळवणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच ठेवले जाईल, असा निर्णय विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतला होता. पोलिसांनी त्यांना रात्री नऊ वाजता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, पावसामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांची परवानगी घेत गुरुवारी पुन्हा आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला.

कुत्र्याने तोडले पाच जणांचे लचके; गुलमंडी, कुंभारवाडा भागात दहशत

यावेळी नितीन वावळे, अमोल खरात, रामेश्वर कबाडे, दीक्षा पवार, अक्षय जाधव, स्वाती चेके, श्रद्धा खरात, अनिल जाधव, राम सूर्यवंशी, सुरेश सानप, लोकेश कांबळे यांची उपस्थित होती.

आमच्या मागण्याबद्दल लेखी मागितले होते. प्रशासनाकडून काहीच मिळाले नाही म्हणून दिवसभर बसलो. पावसामुळे आंदोलन थांबवले आहे. मात्र, पोलिसांची परवानगी घेऊन गुरुवारी (ता. सात) सकाळी पुन्हा नऊ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
- दीक्षा पवार, विद्यार्थी

(edited by- pramod sarawale)