esakal | कुत्र्याने तोडले पाच जणांचे लचके; गुलमंडी, कुंभारवाडा भागात दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

dog bite

कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरणाचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे.

कुत्र्याने तोडले पाच जणांचे लचके; गुलमंडी, कुंभारवाडा भागात दहशत

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत सुरूच आहे. बुधवारी (ता. सहा) मुख्य बाजारपेठेत गुलमंडी व कुंभारवाडा येथे कुत्र्याने धुमाकूळ घालून पाच जणांचे लचके तोडल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये काहीकाळ पळापळ झाली. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत कुत्र्याचा शोध घेतला पण कुत्रा सापडला नसल्याने या भागात दहशत कायम आहे.

भाजपकडून औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी; जलील म्हणाले, सुंदर शहर उद्धवस्त करु नका! 


शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून गाजत आहे. काही भागात मोकाट कुत्रे नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कुत्रा चालवण्याने घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. आठ दिवसांपूर्वी रोषणगेट भागात एका लहान मुलाच्या डोक्याला कुत्र्याने चावा घेतला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी गुलमंडी, कुंभारवाडा रस्त्यावर एका मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातला.

Corona Update: औरंगाबादेत ८३ जणांना कोरोनाची लागण, दोन रुग्णांचा मृत्यू

या कुत्र्याने पायी जाणाऱ्या चार ते पाच जणांना चावा घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. यातील तीन जणांनी तातडीने घाटी रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. दरम्यान, याबाबतची माहिती महापालिकेच्या पथकाला देण्यात आली. पथकप्रमुख शेख शाहेद यांनी तातडीने पथकाला गुलमंडी भागात पाठविले. पथकाने मोकाट कुत्र्याचा पाठलाग केला मात्र कुत्रा सापडला नाही.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

शहरात ४० हजार कुत्रे
कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरणाचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र शहरातील कुत्र्यांची संख्या तब्बल ४० हजारांच्या घरात गेली आहे. दरम्यान, बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक घेण्याचा उपक्रम देखील महापालिकेने सुरू केला आहे. असे असले तरी कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.

Edited - Ganesh Pitekar