लंडनमधील विद्यार्थी संघटनेवर औरंगाबादच्या तरुणाचा विजय

प्रताप अवचार
Saturday, 14 November 2020

लिंकनझीन असोसिएशनवर निवडून जाण्याचा उमर फारुकी यांना बहुमान

औरंगाबाद : लंडन येथे बॅरिस्टरचे शिक्षण घेत असलेल्या उमर कमाल फारुकी हे जागतिकस्तरावरील लिंकनझीन स्टुडंट्स असोसिएशनच्या प्रतिनिधीपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर हा बहुमान उमर फारुकी यांना मिळाला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लिंकनझीन विद्यार्थी संघटनेची निवडणूक ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच वरिष्ठ विधिज्ञांच्या निगराणीखाली होत असते. त्यामुळे या संघटनेची निवडणूक जागतिकस्तरावर प्रतिष्ठेची मानली जाते. संघटनेच्या  निवडणुकीत विजयी होण्याचा बहुमान उमर यांनी मिळवला आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक विधी परिषदेत उमर फारुकी यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील चर्चासत्रात त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. या चर्चासत्रात भारतातून सहभागी होणारे फारुकी हे एकमेव स्पर्धक होते. फारुकी यांनी औरंगाबादच्या एम. पी. लॉ कॉलेजमधून विधी पदवीचे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमाल फारुकी यांचे ते पुत्र आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर

लंडनच्या लॉ युनिर्व्हसिटीतून यापूर्वी बॅ. ए.आर.अंतुले, सोमनाथ चटर्जी, मार्गारेट थॅचर, टोनी ब्लेअर, असदोद्दीन ओवेसी यांच्या सारख्या दिग्गजांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. बॅरिस्टर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात उमर फारुकी हे शिक्षण घेत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बॅरिस्टरची पदवी मिळविणारे ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती ठरतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad youth wins London student union