डॉ. गीतेंवरील कार्यवाही करणार प्रशासन शासनाकडे प्रस्तावित 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 April 2020

देशभर करोनाचे संकट आहे. देश लॉकडाऊन आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या  प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून एफआयआरची प्रत मिळताच त्यांचा कार्यभार काढून घेतला जाईल. त्यांच्यावर पुढील कारवाईची शासनाकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले. सर्वत्र लॉकडाऊनमुळे चक्क शासकीय वाहनात महागड्या दारूच्या बाटल्या आणि ६ लाख ७० हजाराची रोख रक्कम घेऊन जाताना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेचे जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी असलेले डॉ. अमोल गीते शनिवारी (ता.१८) औरंगाबादहून जालन्याकडे जात होते. सरकारी गाडी तसेच मुख्यालय सोडताना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची परवानगी घेतली नव्हती हे त्याच दिवशी स्पष्ट झाले होते. दरम्यान बदनापूरजवळील चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या शासकीय वाहनाची तपासणी केली असता त्या दोन उंची दारूच्या बाटल्या आणि ६ लाख ७० हजारांची रोख रक्कम आढळली होती. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यासंदर्भात बदनापूर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (ता.२०) शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी डॉ. गीतेसंदर्भात काय कारवाई करण्यात आली अशी विचारणा करून त्यांचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश दिले, त्यावेळी सीईओ डॉ. गोंदावले यांनी ही माहिती दिली. 

देशभर करोनाचे संकट आहे. देश लॉकडाऊन आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी सांगितले जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियमानुसार तपासणी करून कडक कारवाईची शिफारस आम्ही करणार आहोत. जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. सीईओ डॉ. गोंदावले यांनी सांगितले आज सोमवारी (ता.२०) पोलिसांकडून एफआयआरची कॉपी प्राप्त होईल. त्यानंतर त्यांचा कार्यभार काढला जाईल आणि पुढील कार्यवाहीबाबत शासनाकडे शिफारस करण्यात येईल असे स्पष्ट केले. 

दरम्यान गुन्हा दाखल झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते सोमवारी जिल्हा परिषदेत आले. ते त्यांच्या दालनात बसून होते तर आढावा बैठकीला जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. डी. बी. घोलप अतिरिक्त आरोग्य अधिकारी म्हणून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांची उपस्थिती होती. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad Administration Proposed To Government About Action Dr Amol Gite