औरंगाबाद जि.प. शिक्षकांच्या पगाराबाबत टोलवाटोलवी ! वाचा नेमकं काय आहे प्रकरण !  

दुर्गादास रणनवरे
Wednesday, 16 September 2020

जालना जिल्ह्याच्या धर्तीवर सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन करा अशी वर्षभरापासून मागणी सुरु आहे. तरी देखील संबंधित विभाग कशी टोलवाटोलवी करीत आहे. 
 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन दरमहा जालना जिल्ह्याच्या धर्तीवर सीएमपी प्रणालीद्वारे एक तारखेला होण्यासाठी शिक्षक संघाच्या वतीने मागील वर्षभरापासून वेळोवेळी पाठपुरावा चालू असतानाही वित्त व शिक्षण विभाग एकमेकांकडे बोट दाखवून मोकळा होत आहे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शिक्षण विभागाकडून एकच गोष्ट वारंवार सांगण्यात येत होती की, याबाबतची कार्यवाही वित्त विभागाने करावी. तर वित्त विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले की वित्त विभागाने काही महिन्यांपूर्वीच याबाबत शिक्षण विभागाला सीएमपी द्वारे वेतन करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संमती दिली आहे. त्यानंतरही शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही. त्यामुळे नेमका कोणता विभाग शिक्षकांच्या पगाराबाबत टोलवा टोलवी करत आहे प्रश्न निर्माण झाला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काय आहे सीएमपी वेतन प्रणाली ? 
कोषागारामार्फत होणारी सर्व प्रदाने, त्रयस्थ अदाते, कर्मचारी यांच्या खात्यामध्ये परस्पर वर्ग करण्याच्या उदिदष्टाने वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने, सीएमपी ( कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट सेंटर ) स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेशी करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात एक करार झालेला असून, या करारान्वये बँकेने विकसित केलेल्या या प्रणाली अंतर्गत शासकीय कार्यालये या प्रणालीशी जोडली गेल्यानंतर त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या प्रणालीने कर्मचाऱ्यांचे पगार थेट त्यांच्या खात्यात जमा होतात.तसेच संबंधित कार्यालयाचे थर्ड पार्टी पेमेंटदेखील संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सीएमपीच्या माध्यमातून वेतन करा : राजेश हिवाळे 
सातत्याने जाणीवपूर्वक वेतन दिरंगाई होत असल्याने शिक्षकांचे वेतन जिल्हा परिषद स्तरावरूनच दरमहा एक तारखेलाच होईल याबाबत ठोस कायमस्वरूपी कार्यवाही करावी. तसेच सी एम पी योजनेच्या माध्यमातून शिक्षकांचे वेतन अदा होईल याबाबत सकारात्मक पावले उचलली जावीत.न्यायालयाने शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बॅंकेतून दरमहा १ तारखेला करण्याचे आदेश दिलेले असतांनाही शिक्षकांचे पगार दुर्देवाने वेळेवर होत नाहीत अशी खंत प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश हिवाळे, संपर्कप्रमुख तथा स्थायी समितीचे सदस्य मधुकरराव वालतुरे, काकासाहेब जगताप ,कैलास गायकवाड आदींनी व्यक्त केली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad Education Department news