कोरोनारुग्णांची हेळसांड का, सदस्यांनी सभेतच केला तांडव ! 

दुर्गादास रणनवरे
Saturday, 19 September 2020

कोरोनामुक्त सदस्यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून प्रशासनाला सभेत विचारला जाब.  

औरंगाबाद : जिल्हाभरातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होते आहे. सुविधांचा गाजावाजा प्रशासन आणि अधिकारी करत असले तरी कोविड सेंटर अपुरे असून, त्यात बेडची कमी आहे, अत्यावश्यक सुविधां देखील वेळेत मिळत नाहीत. रुग्णांची हेळसांड केली जात असून, पुरेसा औषधसाठा देखील नाही. ही भयावह परिस्थिती ऑनलाइनच्या माध्यमातून जि. प. सदस्य मुधकर वालतुरे, रमेश पवार यांनी सभेतसमोर मांडली. यावेळी कोरोना रुग्णांच्या गैरसोयीचा मुद्दा मांडत सदस्यांनी सभेतच प्रश्‍नांचा तांडव उभा केला. प्रशासनाला व आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीची सभा अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण आणि आरोग्य सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण ,सदस्य रमेश गायकवाड, केशवराव तायडे, शिवाजी पाथ्रीकर, पंकज ठोंबरे , किशोर पवार ,जितेंद्र जैस्वाल, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, डॉ. सुनील भोकरे तसेच जि.प.च्या सर्व विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नेहमीप्रमाणे या सभेतही आरोग्याचा विषय प्रामुख्ययाने होता. जिल्ह्यात वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात पोहचला असून, ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. त्या तुलनेत प्रशासन सुविधांचा दावा करत असले तरी रुग्णांना सुविधा प्रत्यक्षात मिळत नाहीत. कोविड सेंटर अपुरे असून, औषधांचा तुटवडा असल्याचे मधुकर वालतुरे यांनी सांगितले. कोरोनाच्या नावाखाली रुग्णास असलेल्या इतर आजाराकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यांची हेळसांडे होते आहे ती थांबवून पुरेसा औषधसाठा त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनावर आतापर्यन्त झालेल्या खर्चाचा हिशोब दाखवा - रमेश गायकवाड 
प्रत्येक सभेत नुसतीच चर्चा होते. परंतु त्या चर्चेतून समोर आलेल्या बाबींवर कृती होत नाही. अमंलबावणी केली जात नाही. आरोग्य विभाग चांगले काम करत असल्याचा गाजावाजा होतो आहे. मग आतापर्यंत झालेला खर्च काय सुविधा दिल्यात, जर सुविधा दिल्या जात आहेत तर रुग्णांकडून तक्रारारी का येत आहेत. खर्चाचा हिशोब दाखवा असे म्हणून रमेश गायकवाड यांनी तर बांधकाम विभागात एफ.डी.वरून केशव औताडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad Health Department news