esakal | अखेर 'आदर्श शिक्षक' पुरस्कारांची यादी जाहीर ! 
sakal

बोलून बातमी शोधा

teacher.jpg

विभागीय आयुक्तालयाकडून मिळाली मान्यता 

अखेर 'आदर्श शिक्षक' पुरस्कारांची यादी जाहीर ! 

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : प्रतिवर्षी शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक (उत्कृष्ट शिक्षक) पुरस्काराच्या यादीला अखेर विभागीय आयुक्तालयाकडून मान्यता मिळाल्याने जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. ०७) विभागीय आयुक्तालयातील आस्थापना उपायुक्त रश्मी खांडेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडे पुरस्कारासाठी मान्यता दिलेल्या शिक्षकांची यादी पाठविली असल्याची माहिती निवड समितीचे सचिव शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हा परिषदेकडून एकूण १७ शिक्षकांच्या निवडीचा प्रस्ताव निवड समितीच्या प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्षा मीना रामराव शेळके यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या शिक्षकांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. यामध्ये ९ प्राथमिक व ७ माध्यमिक तसेच एका विशेष शिक्षकाचा समावेश होता. पुरस्काराच्या खर्चालाही विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये covid-१९ प्रादुर्भाव विचारात घेऊन तसेच राज्य शासन व केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना देखील विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आल्या आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षकांची नावे 
योगिता सर्जेराव मोरे (जि.प.प्रा.शा. शेंद्राबन तालुका औरंगाबाद) मनोज कुमार उत्तमराव सोनवणे (जि.प.प्रा.शा. सुदामवाडी तालुका वैजापूर ) अशोक जिजाभाऊ पाटील (जि.प.प्रा.शा. तारु पिंपळवाडी तालुका पैठण) शेनफडू भिकन वनारसे (जि.प.प्रा.शा. अंधानेर तालुका कन्नड) आबाजी दगाजी सोनवणे (जि.प.प्रा.शा.नेवरगाव तालुका गंगापूर) सुनिल गंगाराम वानखेडे (जि.प.प्रा.शा. घाटनांद्रा तालुका सिल्लोड) वैशाली किसनराव जाधव (जि.प.प्रा.शा.बाभु ळगाव तालुका फुलंब्री) अशोक सदाशिव विघ्ने (जि.प.प्रा.शा.पळसगांव तालुका खुलताबाद) उमेश हरी महालपुरे (जिल्हा परिषद प्रशाला बनोटी तालुका सोयगाव) 

पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षकांची नावे 
मोहम्मद फहीम मोहम्मद अय्युब ( जि.प. प्रशाला सातारा खंडोबा तालुका औरंगाबाद) मनीषा धनराज कुमावत (जि.प. प्रशाला खंडाळा तालुका वैजापुर) अशोक वसावे (जि.प. प्रशाला चिकलठाणा तालुका कन्नड) शिवकुमार श्रीरामजी जैस्वाल (जि.प. प्रशाला वाळूज तालुका गंगापूर) बबन बालाजी सोनवणे (जि.प. प्रशाला शिवना तालुका सिल्लोड) शैलजा देवदास नाईकवाडे (जि.प. प्रशाला गणोरी तालुका फुलंब्री) दत्तात्रय पांडुरंग जाधव (जि.प. प्रशाला कसाबखेडा तालुका खुलताबाद) तर सोयगाव व पैठण या
दोन तालुक्यांतून माध्यमिक शिक्षकांचा एकही प्रस्ताव आला नव्हता. 

पुरस्कार प्राप्त विशेष शिक्षकाचे नाव 
कल्याण सखाराम सोनवणे, हस्तकला शिक्षक (जि.प. प्रशाला फुलंब्री तालुका फुलंब्री ) 

विशेष उल्लेखनीय कार्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे 
रोहिणी विद्यासागर पिंपरखेडकर (जि.प.प्रा.शा. कुंभेफळ तालुका औरंगाबाद), अशोक मनोहरराव गंधे (जि.प.प्रा.शा. म्हस्की, तालुका वैजापूर ), भाऊसाहेब गेणुजी भिसे (जि.प. केंद्रीय प्रा.शा. गंगापूर) , कैलास भिकनराव गायकवाड (जि.प.प्रा.शा.खांडी पिंपळगाव तालुका खुलताबाद) तसेच विजय आनंदराव राऊत (जि.प.प्रशाला बाजारसावंगी, तालुका खुलताबाद ), बापू सकदेव बावीस्कर (ता. सोयगाव) विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल जिल्ह्यातून प्राथमिक व माध्यमिक विभागातून एकूण सहा शिक्षकांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा मिना रामराव शेळके व शिक्षण सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी दिली. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)