वाहनाची स्वस्त पॉलिसी अपघातानंतर पडू शकते महाग !

अनिलकुमार जमधडे
Monday, 28 September 2020

  • विमा घेताना पळवाटा समजून घ्या 
  • डिस्काउंटचे आमिष अंगलट येण्याचा धोका 
  • पॉलिसीचा योग्य प्रकार निवडण्याची गरज 

औरंगाबाद : वाहनाचा विमा घेतल्यानंतर वाहनमालक बिनधास्त होतो; मात्र प्रत्येकाने वाहनाच्या विम्याबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाच्या पॉलिसीमध्ये काय बाबी नमूद आहे. त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

विमा पॉलिसी घेताना विमा कंपनीकडे विविध प्रकारच्या पॉलिसीचा समावेश असतो. त्यामुळे आपण घेत असलेली पॉलिसी आपल्या गरजा पूर्ण करू शकणार आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. पॉलिसी देताना डिस्काउंट देण्याचे आमिष कंपनीचे प्रतिनिधी दाखवत असातात,; मात्र हे डिस्काउंट देताना अनेक वेळा विमा प्रतिनिधी चालबाजी करतो. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी होते फसवणूक व्यापक विमा (फुल इन्शुरन्स) मोटार वाहनासाठी ही सर्वाधिक महागडी पॉलिसी आहे; मात्र विमा प्रतिनिधी डिस्काउंटच्या नावाखाली वाहनातील चालक वगळता अन्य प्रवाशांना विमा क्लेममधून वगळतो. त्यामुळे प्रीमियम वाचतो परिणामी पॉलिसी स्वस्त होते, त्यालाच विमा प्रतिनिधी डिस्काउंट दिला असे सांगतो. अपघात झाल्यानंतर या प्रकारातील पॉलिसीत वाहनातील चालक वगळता अन्य प्रवाशांना कव्हर केलेलेच नसते, त्यामुळे या प्रवाशांचा दावा कंपनी फेटाळून लावते. मात्र, थेट अपघात झाल्यानंतर वाहनमालकाला हा प्रकार समजतो. विमा पॉलिसी निवडण्याचा हा एक प्रकार आहे; मात्र समजून घेतले तर ही पॉलिसी कामाची नसल्याचे लक्षात येते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विचारपूर्वक घ्या निर्णय 
असाच काहीसा प्रकार थर्ड पार्टी इन्शुरन्सचेही आहे. यात आपल्या वाहनाने झालेल्या समोरच्या वाहनाची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे; पण तुमच्या वाहनातील व्यक्ती मृत झाल्यास त्यांचा क्लेम मिळणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. असे असले तरीही मात्र यात काही कंपन्या थोडा अधिक प्रीमियम घेऊन तुमच्या वाहनातील प्रवाशांची जोखीम स्वीकारतात, तरीही तुमच्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई मात्र मिळत नाही. वाहन चोरी गेले तर त्याचीही भरपाई मिळत नाही. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अपघातानंतर सुटका नाही 
कुठल्याही तडजोडीने विमा घेताना काही रक्कम वाचवता येते. त्याचप्रमाणे पोलिस अथवा आरटीओ तपासणीतून सुटका होते; परंतु यामुळे अपघातानंतर सुटका होत नाही. खरा मनस्ताप अपघाताच्या घटनेनंतरच होतो. अपघातातून सावरण्यासाठी विमा आहे; मात्र यामुळे सावरण्याऐवजी प्रसंगी अपघातापेक्षाही हा प्रकार घातक ठरू शकतो. बहुतांश विमा कंपनीच्या पॉलिसीचा फाँट साईज अत्यंत बारीक असतो. त्यामध्येच अनेक पळवाटा अथवा त्रुटी असतात, त्याचा बारकाईने अभ्यास केला नाही तर त्रासदायक ठरू शकते.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Accident Series Four Cheap policies can fall expensive after an accident