esakal | पेटच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर, पात्र विद्यार्थ्यांची यादी शनिवारी लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal News

पेट परीक्षा ११ हजार १५४ विद्यार्थ्यांनी दिली होती. तर, ६१४ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते.

पेटच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर, पात्र विद्यार्थ्यांची यादी शनिवारी लागणार

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन ‘पेट’ परीक्षेतील पहिल्या पेपरचा निकाल सोमवारी (ता.१) जाहीर झाला. प्रवर्ग आणि गुण पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची यादी शनिवारी जाहीर केली जाणार आहे.

मुंगेरीलाल निर्मला सीतारामन यांचे हँसीन सपने, इम्तियाज जलील यांची अर्थसंकल्पावर टीका


पेट परीक्षा ११ हजार १५४ विद्यार्थ्यांनी दिली होती. तर, ६१४ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. यातील पाच हजार ६८८ विद्यार्थ्यांनी मराठीत, २८४ संशोधकांनी हिंदीत तर, इंग्रजी भाषेतून पाच हजार १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. वजा गुण पद्धतीमुळे ११६ विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठवाड्यातील नागरिकांना दाखवलेले स्वप्न राहणार स्वप्नच?

एक ते ४४.५ टक्के गुण असलेले चार हजार २६३ विद्यार्थी आहेत. ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार ७७५ आहे. खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत. २१ फेब्रुवारी रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल आणि २८ फेब्रुवारीला दोन्ही परीक्षेचा एकत्रित निकाल जाहीर करुन प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.

Edited - Ganesh Pitekar