Bharat Bandh Updates : जुलमी कायदा रद्द न केल्यास शेतकरी सरकारला जागा दाखवून देईल - अब्दुल सत्तार

सचिन चोबे
Tuesday, 8 December 2020

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करित भारत बंद आंदोलनात सहभागी होत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता.आठ) सोयगाव व सिल्लोड येथे आंदोलन केले.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करित भारत बंद आंदोलनात सहभागी होत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता.आठ) सोयगाव व सिल्लोड येथे आंदोलन केले. सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना श्री.सत्तार म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय दोन-तीन दिवसांत जर नाही घेतला तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील.

 

जुलमी कायदा रद्द न केल्यास जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवून देईल. शिवसेना कायम शेतकरी हिताचे निर्णय घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर लाखोंच्या संख्येने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नियोजन करण्यात येऊन लाखोंच्या संख्येने दिल्ली धडक देण्याचे विधान सत्तार यांनी केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh Updates Minister Abdul Sattar Participat In Bandh