esakal | Bharat Bandh Updates : औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर, आडूळचे आठवडे बाजार रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Bandh In Sillod

औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ, पिशोर येथील आठवडे बाजार भरला नाही. पिशोर येथे सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला.

Bharat Bandh Updates : औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर, आडूळचे आठवडे बाजार रद्द

sakal_logo
By
सकाळ टीम

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ, पिशोर येथील आठवडे बाजार भरला नाही. पिशोर येथे सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला. औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश गावात असा शुकशुकाट आहे. भारत बंदच्या दरम्यान जुने कायगाव (ता.गंगापूर) येथील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. कायगाव (ता.गंगापूर) येथील औरंगाबाद- पुणे महामार्गावर तुरळक वाहनांची वाहतूक सुरू आहे.

Bharat Bandh Update: औरंगाबादच्या बाजार समितीत आडत व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत व्यवहार बंद ठेवले

कन्नड तालुक्यातील चापानेर येथील बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी शेतकरी आंदोलनाला शंभर टक्के पाठिंबा दर्शविला आहे. चिकलठाणा  येथे  शहर भागातही जीवनावश्यक दुकाने वगळता कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. औरंगाबाद तालुक्यातील बाजारपेठेचे मोठं-मोठे गावे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने वगळता कडकडीत बंद आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायदा विधेयकाला विरोध करीत हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनामुळे सिल्लोड शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंदच ठेवली. शिवसेनेने काल भारत बंदला पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. शहरात बंदच्या अनुषंगाने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे सर्व बाजारपेठ सुरुळीत सुरु आहे. दुसरीकडे पाचोड येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर