esakal | कर्जमाफी, महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचे धरणे 
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफी, महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचे धरणे 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना भाजप सरकारच्या काळात शासनाच्या वतीने देण्यात येणारे सुरक्षा साहित्य सेफ्टी कीट देण्याचं शासनानं बंद केले, असा आरोप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केला.

कर्जमाफी, महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचे धरणे 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, सरकारच्या बेफिकिरीमुळेच महिलांवरील अत्याचार वाढले, असा आरोप करीत या निषेधार्थ मंगळवारी (ता.२५) भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेत यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा - महापालिका निवडणुक : बदल किरकोळ, गडबडी कायम

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले, की नागपूर येथे या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र त्याचा लाभ अजूनही झालेला नाही. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनदेखील या राज्य सरकारने पाळले नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होतं. ती मदत पण दिली नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचा - Good News : औरंगाबाद महापालिका करणार नऊ रस्त्यांची कामे

तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बांधकाम कामगारांना भाजप सरकारच्या काळात शासनाच्या वतीने देण्यात येणारे सुरक्षा साहित्य सेफ्टी कीट देण्याचं शासनानं बंद केले, असा आरोप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, डॉ. भागवत कराड , संजय केनेकर, दिलीप थोरात बसवराज मंगरुळे, समीर राजूरकर, प्रशांत देसरडा माधुरी अदवंत शिरीष बोराळकर प्रमोद राठोड राजगौरव वानखेडे शिवाजी दांडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत

हेही वाचा - चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली...कोणी केला आरोप, वाचा...

दुटप्पी भुमिका आता तरी सोडा 

सरकार स्थापन करीत असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडी सरकार सरकारच्या प्रमुखांना दिलेल्या आश्वासनांचा कसा काय विसर पडला, असा प्रश्‍न उपस्थित करीत ही दुटप्पी भुमिका आता तरी सोडा, अशी टिका यावेळी करण्यात आली.