भाजपतर्फे गरजुंसाठी नऊ ठिकाणी मदत सेवा केंद्र

bjp1
bjp1

औरंगाबाद : वृद्ध, दिव्यांगासह गरजुंना काही मदत लागल्यास ती तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहर परिसरात विशेष मोफत मदत सेवा केंद्र सुरु केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून कफ्युही जारी करण्यात आला आहे. 

या आपत्तकालीन परिस्थितीत गरजु व्यक्तीला काही मदत लागल्यास ती तत्काळ पुरविता यावी, यासाठी भाजपतर्फे शहर परिसरात नऊ ठिकाणी मदत सेवा केंद्र सुरु केली आहेत. या केद्रांतर्फे मदत पुरविणेही सुरु झाले आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी शुक्रवारी(ता.२७)दिली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दिव्यांग, निराधार व्यक्ती, आजारी व्यक्ती,वसतिगृहातील विद्यार्थी, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार, हातावर पोट असणारे, मोल-मजुरी करणारे कामगार यासह कोण्याही गरजुंनी संपर्क साधल्यास त्यास मदतीसाठी कार्यकर्ते तत्पर असतील. हॉस्पिटलमध्ये जाणे असो वा, किराणा साहित्य आणून देणे असो केंद्रामार्फत सर्व सेवा पुरविली जाईल. केंद्रात एक केंद्र प्रमुख व दोन मदतनीस २४ तास राहणार असून मदतीची आवश्यकता भासल्यास गरजुंनी संपर्क साधवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या सर्व सेवा गरजुंना निःशुल्क पुरवल्या जातील. 

या सेवा पुरवणार आहोत. 

  • आरोग्य विषयी तातडीची सेवा 
  • रक्त पुरवठा सेवा 
  •  वृद्ध, दिव्यांग, असंघटित कामगार ,निराधाराना अत्यावश्यक सेवा पुरवणे. 
  • इमर्जन्सी लोकल वाहन सुविधा पुरवणे. 
  •  अत्यावश्यक ठिकाणी अन्न व पाणी सेवा. 
  • -अंत्यविधीसाठी काही अडचन येऊ नये या साठी सेवा. 
  •  करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती, मार्गदर्शन करणे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गुलमंडी विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ :- शिवाजी हायस्कूल समोर, राजू बुर्कुल यांचे संपर्क कार्यालय, खोकडपुरा, 
(मदतनीस केंद्र प्रमुख) रामेश्वर भादवे ९६७३७८८२८३, 
सुधाकर जाधव ९३२५२५५०३२, राजू बुर्कुल ९५४५११८२२० 

हडको विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : नितिन चित्ते यांचे संपर्क कार्यालय, हडको 
(मदतनीस केंद्र प्रमुख) नितिन चित्ते ९४२२७०३८७७, 
(मदतनीस) सागर पाले ९४२३१५०२९५, राहुल रोजतकर ९७६४५६०९९९. 

क्रांतिचौक विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : कंधारकर हॉस्पिटलच्या बाजुला, चेतक घोडा, जवाहर कॉलनी, 
अजय संतोष शिंदे ९९२३६०९९९९, 
शंकर म्हात्रे ९९२३७९८४१३, मिलिंद काकडे ९९२३९१३९३६. 

सिडको विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : एन-६, सिडको, आविष्कार चौक, 
अरुण निवृती पालवे ९९२११५१५२३, 
दिगंबर खरात ९८९०३६४१४, श्रीनिवास देव ८०८७०६०८१६, 

मुकुंदवाडी विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : चौधरी कॉलनी, चिकलठाणा, 
संजय सांडूजी चौधरी ९९२३९९००३३, किशन ठुबे९८५०२७४०४८, मनसुर पटेल ९७६३५५४४५५ 

गारखेडा विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : गारखेडा परिसर, 
लक्ष्मीकांत कृष्णकुमार थेटे ९९६०७८४४४९, 
गणेश सोनवणे ९१७५९६२९०७, श्रीकांत घुले ८६९८४४४४९८ 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

छावणी पदमपुरा विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : पंजाब भवन समोर, पडेगाव, 
(दिपक भाऊसाहेब बनकर ९९७५२०३०१५, 
राहुल निकम ९७६६८९२०५२. सुनील सोनवणे ८७८८८५८८८७ 

सातारा-देवळाई विभाग 
तातडीची मदत सेवा स्थळ : शरणाअप्पा बिराजदार यांचा हॉल, आयप्पा मंदिराजवळ, 
प्रवीण रत्नाकर कुलकर्णी ७५८८५३२८३२, 
राहुल देशमुख ९०११८७७७०८, ज्ञानेश्वर बोरसे ९३२५२६२४८६ 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com