भाजपतर्फे औरंगाबादेत १०० क्विंटल धान्याचे होणार वाटप

प्रकाश बनकर
Monday, 13 April 2020

भाजपतर्फे शहरात शंभर क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. १३) शहरातील नऊ मंडळांत वॉर्डा-वॉर्डांत हे धान्यवाटप करण्यात येत आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. 

औरंगाबाद: देशावरील आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे. भाजप शहर कार्यकारिणीतर्फे शहरातील असंघटित कामगार, मजदूर, हॉकर्स व रोजंदारी कामगारांच्या मदतीसाठी हात पुढे करण्यात आला आहे.

भाजपतर्फे शहरात शंभर क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. १३) शहरातील नऊ मंडळांत वॉर्डा-वॉर्डांत हे धान्यवाटप करण्यात येत आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. 

हेही वाचा : थेट कोरोना बाधितांच्या वाॅर्डातुन, असा आहे रुग्णांचा दिनक्रम

श्री. केणेकर म्हणाले, भाजपतर्फे शहरातील नऊ मंडळांत मंडळ अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून गरीब, गरजू अशा १५ हजार कुटुंबीयांना पाच किलो अन्नधान्याची बॅग वाटप करणार आहोत.

हेही वाचा पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक

आज कलश मंगल कार्यालयात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, अनिल मकरिये, भगवान घडामोडे, कचरू घोडके, मनोज पांगारकर, रामेश्वर भादवे, एजाज देशमुख, अमृता पालोदकर यांच्या उपस्थितीत आज मंडळ अध्यक्षांकडे धान्य पोच करण्यात आले.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

मंडळ अध्यक्ष हे वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून त्या-त्या वॉर्डात गरजू व कामगारांना धान्यवाटप करणार आहेत. यामुळे गरजूंना या काळात मोठा आधार मिळणार आहे. 

हेही वाचा :  बँकेसमोर ग्राहकांच्या नाही हो ........ या तर चपलांच्या रांगा

भाजपतर्फे सदैव शहरवासीयांच्या पाठीशी व सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. त्याच माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. गरजू लोकांनी आपल्या वॉर्डातील अध्यक्ष तसेच मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून हे धान्य घेऊन जावे, असे आवाहनही संजय केणेकर यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will distribute 100 quintals of grain Aurangabad News