esakal | पैठणला केमिकल कंपनीत स्फोट : आगीचे लोळ, पंधरा किलोमीटरपर्यंत गेला आवाज
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

पैठणच्या एमआयडीसी येथे अत्यावश्यक सेवेत सुरू करण्यात आलेल्या शालिनी केमिकल कंपनीमध्ये बुधवारी (ता. २२) सकाळी केमिकल टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता, की पंधरा किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाचे हादरे गेल्याने नागरीक भयभीत झाले होते.

पैठणला केमिकल कंपनीत स्फोट : आगीचे लोळ, पंधरा किलोमीटरपर्यंत गेला आवाज

sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी : पैठणच्या एमआयडीसी येथे अत्यावश्यक सेवेत सुरू करण्यात आलेल्या शालिनी केमिकल कंपनीमध्ये बुधवारी (ता. २२) सकाळी केमिकल टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता, की पंधरा किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाचे हादरे गेल्याने नागरीक भयभीत झाले होते.

एमआयडीसी पैठण येथील शालीनी केमिकल कंपनीमध्ये लहान मुलांच्या पोटातील जंताच्या औषधांचा कच्चा माल तयार केला जातो. या कंपनीतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला. या कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये तीन कामगार व एक सुरक्षारक्षक होता, मात्र सकाळी शिफ्ट संपल्याने ते कामगार गेटजवळ आले आणि तेवढ्यात कंपनीमधील आठ स्टोअरेज टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाल्याने त्यातील १२०० लिटर केमिकल बाहेर फेकल्या गेले. त्याने तात्काळ पेट घेतला. 

पळून गेलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी...

कंपनीच्या वरच्या भागात एकच आगडोंब उसळला व स्फोटाचा आवाज सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील कंपनी इमारती व उभ्या वाहनांच्या काचांना तडे गेले. आवाजामुळे एमआयडीसी व परीसरातील लोक अचानक झालेल्या आवाजामुळे घाबरून इमारतीबाहेर आले असता कंपनीमध्ये उसळलेला आगडोंब दिसला. 

एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत आजुबाजूचे रहदारीचे रस्ते तात्काळ बंद करून निर्मनुष्य केले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली कंपनी ही प्लाॅट क्रमाक ए -७५ मध्ये असून ती शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहे.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या बाॅंब शोधक पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार विद्या झिरपे, सहाय्यक फौजदार अशोक महाले, प्रदीप जाधव, बाॅंब शोधक पथकाचे फौजदार भाऊसाहेब एरंडे, गोरखनाथ शेलार, सुनील दांडगे, शत्रु्घन मडावी उपस्थित होते.

go to top