पाचोड पोलिसांनी अठ्ठ्याहत्तर गावात केले आवाहन, ११३ जणांचे रक्तदान !

blood donate.jpg
blood donate.jpg

पाचोड (औरंगाबाद) :  पोलिसांनी सामाजिक पुढाकाराचे पाऊल उचलत रक्तदान करण्याचे आवाहन करताच एकशे तेरा तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची गरज लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश गावडे, सहायक पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या पुढाकारातून जिल्हाभर रक्तदान शिबीरे घेण्यात आली. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अतुल येरमे व पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस ठाणेअंतर्गत ७८ गावांत रक्तदान करण्यासंबधी जनजागृती करून रक्तदान करण्याचे आवाहन केले. अन् एकशे तेरा रक्तदात्यांनी पाचोड पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

पाचोड येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित शिबीरात एकशे तेरा तरूणांनी रक्तदान केले. याप्रसंगी रंगाबादच्या शासकीय वैद्यकिय महाविदयालय येथील रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सिमी, डॉ. प्रतीक्षा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदरील रक्त औरंगाबाद घाटी रुग्णालयाचे रक्तपेढी जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, तंत्रज्ञ सुमन धुळे, सहाय्यक राजेंद्र लोखंडे ,शैलेंद्र शेळके, सतीश खारमटे, शुभम सोळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी संकलीत केले.

मानवी रक्त प्रयोगशाळेत तयार होत नाही, त्यासाठी आपणास मानवाकडेच जाऊन त्याची मागणी करावी लागते. मागणी झाली की व्यवहार येतो. मानवानेच मानवाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करावयाचे असल्याने मानवतेच्या या सर्वोच्च सेवेमध्ये कुठेही व्यवहार येऊ देऊ नये. म्हणूनच रक्त देण्याच्या प्रक्रियेत दोन शब्दांची योजना करून ही संकल्पना मानवी मूल्यांच्या पवित्र भावनेस जोडली आहे. एक शब्द आहे 'दान' व दुसरा आहे 'स्वेच्छा'. या दोन शब्दांच्या योजने मुळे या कृतीची उदात्तता खूप वाढली आहे. जसे गरजू रुग्ण रक्त घेताना जात, धर्म, रंग, उच्च -निच पाहत नाही, त्याचप्रमाणे समाजात वावरताना जातीयतेला खतपाणी न घालता सर्वधर्म समानतेला अग्रणी ठेवावे, 'दान म्हटले की मोबदल्याची अपेक्षा न ठेवणे व स्वेच्छा म्हटले की स्वतःहून स्वतःसाठी ती कृती करणे हे आहे. आपणा सर्वांवर त्या संकल्पनेमधील उदात्तता, पावित्र्य व मानवसेवा जपण्याची जबाबदारी असुन आपण उदात्त मनाने वर्षातुन चार वेळा रक्तदान करावे. -गोरख भामरे, सहायक पोलिस अधिक्षक 


रक्तदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दुर करण्यात यावयास यावे. रक्तदान ही काळाची गरज आहे.शरीरामध्ये पाच लिटर रक्त असते. त्यातील ३५० मिली काढून घेतले जाते. एखाद्या भरलेल्या विहिरीमधून बादलीभर पाणी काढल्यासारखे ते आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी घाबरुन जाता कामा नाही. रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी निर्माण होण्यास चालना मिळून आपल्या शरीरामधील रक्ताची गुणवत्ता वाढीस लागते. 
अतुल येरमे, सहायक पोलिस निरीक्षक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com