esakal | धक्कादायक ..औरंगाबादेतील हॉस्पिटलच सील, वाचा कारण
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

या हॉस्पिटलसह पॉझिटीव्ह महिला आणखी एका बड्या रुग्णालयात गेली. या दोन्ही रुग्णालयाचे एकुण तेरा जणांशी महिलेचा संर्पक आला. यात डॉक्टर व इतर स्टाफ असुन त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सकाळ ला दिली.

धक्कादायक ..औरंगाबादेतील हॉस्पिटलच सील, वाचा कारण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबादेतील एका ६५ वर्षीय पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्यांची हिस्ट्री काढण्यात आली. त्या महिलेने घाटी रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी एक दिवस एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. आता ते हॉस्पिटल १४ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेने तसे पत्रही या हॉस्पिटलच्या आवारात चिकटविले आहे. या हॉस्पिटलसह पॉझिटीव्ह महिला आणखी एका बड्या रुग्णालयात गेली. या दोन्ही रुग्णालयाचे एकुण तेरा जणांशी महिलेचा संर्पक आला. यात डॉक्टर व इतर स्टाफ असुन त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सकाळ ला दिली.

बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेला तेरा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचे स्वॅब चाचणीचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल सोळा एप्रिलला प्राप्त झाला. त्यांची कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या महिलेला मधुमेह, रक्तदाब, डायबेटीज नॅफ्रोपॅथी (मधुमेह मूत्रपिंडाचा आजार) आजार आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, ६५ वर्षीय महिलेने तेरा एप्रिलपूर्वी दोन खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यातील एका रुग्णालयात त्या एक दिवस भरती होत्या.

त्या नंतर त्या दुसऱ्या बड्या रुग्णालयात गेल्या. या दोन्ही रुग्णालयात त्या डॉक्टर व इतर स्टाफ मिळुन तेरा जणांच्या संपर्कात आल्या होत्या. त्या सर्वांना होम कॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांचे स्वॅबही घेण्याच येणार आहेत.

त्यामुळे महिलेला एक दिवस भरती करण्यात आलेले रुग्णालयच १४ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसे पत्रही हॉस्पिटलच्या आवारात डकविण्यात आले आहे. आतापर्यंत ती महिला ४८ जणांच्या संपर्कात आल्याची माहिती स्पष्ट झाल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा