esakal | ब्रिटनहून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, आतापर्यंत औरंगाबादेत आढळले दोन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

20navi_20mumbai_6_1

ब्रिटन येथून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यापाठोपाठ ब्रिटनहून आलेला आरेफ कॉलनीतील एक २९ वर्षीय तरुणाची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली.

ब्रिटनहून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, आतापर्यंत औरंगाबादेत आढळले दोन रुग्ण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : ब्रिटन येथून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यापाठोपाठ ब्रिटनहून आलेला आरेफ कॉलनीतील एक २९ वर्षीय तरुणाची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली. या तरुणाची शनिवारी (ता. २६) ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली होती. रविवारी (ता. २७) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली. ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गात अनेकजण आले, त्यामुळे कोरोनाच्या नव्या रुपाने जग धास्तावले. ब्रिटनहून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी अत्यंत चोखपणे केली जात आहे.

शहरातही महापालिका प्रशासनाने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले. शुक्रवारी (ता. २५) ब्रिटनहून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या महिलेला धूत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आज रविवारी ब्रिटन येथून आलेला २९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या तरुणाची काल शनिवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली होती. त्याच्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला. या तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.अजून पाच नागरिकांचा शोध
महापालिका क्षेत्रातील १३ नागरिकांचा शोध लागत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. पोलिस प्रशासन शोध घेणार असल्याचे समजताच १३ पैकी ८ नागरिकांनी कोरोना चाचणी करुन घेतली. परंतु पाच नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar