esakal | CCTV : धडधडत्या रेल्वेने काळजाचा ठोका चुकला, तीन सेकंदांनी वाचले तिघांचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली झालेल्या थरारक घटनेने क्षणभर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. घटनेतून दुचाकीवरील दोन पुरुषांसह एका महिलेची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

CCTV : धडधडत्या रेल्वेने काळजाचा ठोका चुकला, तीन सेकंदांनी वाचले तिघांचे प्राण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली रेल्वेची पटरी ओलांडण्याचा दुचाकीस्वाराचा प्रयत्न सुरू होता. रेल्वेपटरीला दुचाकी अडकल्याने तिघेही खाली कोसळले अन्‌ क्षणार्धात धडधडत रेल्वे आली. अवघ्या तीन सेकंदाचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. तीन सेकंदांनी तिघांचे प्राण वाचवले; मात्र या घटनेतील दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. 

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली झालेल्या थरारक घटनेने क्षणभर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. घटनेतून दुचाकीवरील दोन पुरुषांसह एका महिलेची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

रविवारी (ता.16) सायंकाळी साडेसात वाजेची वेळ होती. बीड पायपास रस्त्याकडून शहराच्या दिशेने एक दुचाकी (एमएच-20, सीजे-3251) आली. दोन पुरुष आणि एक महिला दुचाकीवर होती. दुचाकीवरून रेल्वेचा रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करताच दुचाकी अडकून तिघेही खाली कोसळले.

आमचे जुळले, तुमचे कसे जुळले जरा सांगा की...

त्यांच्या मदतीला स्थानिक नागरिक धावले. रुळावरून तिघांना बाजूला केले. त्यानंतर अवघ्या तीन सेकंदांत काचीगुडा नगरसोल (क्र. 57561) एक्‍स्प्रेस धडधडत आली. रुळावरून दुचाकी काढणे शक्‍य झाले नव्हते. त्यामुळे दोनशे ते तीनशे फुटापर्यंत रेल्वेने दुचाकीला ओढत नेले. त्यात दुचाकीचा चुराडा झाला.

टिकटॉकची अफवा 

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली रेल्वेने दुचाकीला उडवल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली, असे असले तरीही दुचाकीस्वार तरुण टिकटॉक व्हिडिओ करत होता, अशी जोरदार अफवा या भागात पसरली होती. प्रत्यक्षात अत्यंत गंभीर अशी घटना होती हे सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाले.

तीनशे फूट अंतर गेल्यानंतर रेल्वे थांबली. जमलेल्या गर्दीचा फायदा घेत तोपर्यंत दुचाकीस्वार पसार झाले. चिकलठाण्याहून औरंगाबाद शहराच्या दिशेने येणारी रेल्वे साधारण शंभरच्या स्पीडने होती, असे प्रत्यक्षदर्शी या भागातील समाजसेवक श्रीमंत गोर्डे यांनी सांगितले.

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

सुदैवाने या घटनेत कुणाचीही प्राणहानी झाली नाही किंवा रेल्वेचीही कुठली हानी झाली नाही; मात्र रेल्वे इंजिनच्या खाली अडकलेली दुचाकी काढण्यासाठी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. ते दुचाकीस्वारांचा तपास करत आहेत. ही दुचाकी आकाश दीपक जायभाये नामक व्यक्तीची असल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे. 

go to top