esakal | बीड क्राईम - पुष्पा शर्माचा खून करणारे निघाले...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र
  • पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती 
  • गेवराई तालुक्‍यातील इतर गुन्ह्यांतही समावेश 
  • कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना शोध लावण्यात यश 

बीड क्राईम - पुष्पा शर्माचा खून करणारे निघाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - गेवराई शहरातील खक्का मार्केट परिसरातील पुष्पा शिवप्रसाद शर्मा (वय 62) या वृद्धेचा खून करून सात लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेतील आरोपी हे बांधकाम मजूर असल्याचे समोर आले आहे. दिवसा बांधकाम आणि रात्री असे प्रकार हे दोन आरोपी करत होते. 

कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आणि पोलिस दप्तरी नोंद नसलेले हे दोन आरोपी गेवराई तालुक्‍यात मागच्या वर्षभरात घडलेल्या या खुनाच्या घटनेसह वाटमारी, जीवघेणा हल्ला करून चोरी प्रकरणाशीही संबंधित आहेत. या पोलिस दलासाठी क्‍लिष्ट झालेल्या प्रकरणांचा छडा लावण्यात दरोडा प्रतिबंधक पथकाला यश मिळाले आहे. 

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

शेख नदीम शेख लालू (32, रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई) व सय्यद मोहम्मद उस्मान अली (रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव उपस्थित होते. 

हेही वाचा - आमदारांच्या सासऱ्याचे उपोषण अन तलाठ्यांचे निलंबन..

गेवराई शहरातील खक्का मार्केट परिसरात ता. एक एप्रिल 2019 रोजी पहाटे हा थरार झाला होता. पिग्मी एजंट प्रवीण शिवप्रसाद शर्मा यांच्या आई पुष्पा यांच्या निघृण हत्येनंतर दरोडखोराने दागिने व रोकड असा एकूण सात लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासह गेवराईतच धनगर गल्ली भागातही चोरीची घटना घडली होती. तर ट्रकचालकाला मारहाण करून लुटण्याची घटनाही घडली होती. यामुळे गेवराईत चोरींच्या आणि अशा खुनाच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

पोलिसही तपासासाठी जंग-जंग पछाडत होते. अखेर साडेदहा महिन्यांनी दरोडा प्रतिबंधकाला या आरोपींचा छडा लावण्यात यश आले. विशेष म्हणजे या आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना छडा लावल्याचे हर्ष पोद्दार यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी उशिरा गेवराईच्या बाह्यवळण रस्त्याच्या पुलाखाली हे दोन आरोपी होते. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी पळ काढण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

दरम्यान, आरोपींकडून शस्त्र आणि रोख तीन लाख दोन हजार रुपयेही जप्त करण्यात आले. कारवाईत श्री. जाधव यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक श्री. सावळे, एम. एन. सौंदरमल, आर. बी. नागरगोजे, एस. एम. उबाळे, एस. बी. औताडे, डी. बी. आवारे, एम. आर. वाघ, एम. एस. भागवत, एस. एम. जोगदंड, ए. ए. गव्हाणे, एम. एम. चव्हाण, जी. व्ही. हजारे, डी. सी. गित्ते, श्री. डोंगरे, श्री. दुधाळ यांनी सहभाग घेतला. 

loading image
go to top