esakal | CTET: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ३९ केंद्रांवर १५ हजार उमेदवारांनी दिली, कोरोनामुळे विशेष काळजी  
sakal

बोलून बातमी शोधा

CTET Aurangabad News

प्रत्येक वर्गात फक्त १५ ते २० उमेदवारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बसवण्यात आले होते.

CTET: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ३९ केंद्रांवर १५ हजार उमेदवारांनी दिली, कोरोनामुळे विशेष काळजी  

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (सीटीईटी) रविवारी (ता.३१) शहरातील ३९ केंद्रांवर सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण १५ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेत असलेल्या सीबीएसई बोर्डाने प्रत्येक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे तापमान तपासून प्रवेश देण्यात आला. प्रत्येक वर्गात फक्त १५ ते २० उमेदवारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बसवण्यात आले होते.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ यासह विविध घोषणांनी अंबड दणाणले

उमेदवाराने परीक्षा केंद्रांवर ५० मिलीलीटर पारदर्शक बाटलीमध्ये स्वतःचे सॅनिटिझर, पाण्याची पारदर्शक बाटली, तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घातलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. तसेच प्रवेशपत्र, ओळखपत्र, आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तपासण्यात येत होते. शहरात एकूण ३९ केंद्रांवर सीटीईटीच्या परीक्षेला एकूण १५ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. 

Edited - Ganesh Pitekar