
अतिक्रमण काढण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत बेकायदेशीररित्या जमाव जमवून पोलिसांनी लावलेले लोखंडी बॅरिकेट्स तोडून तसेच लाकडी बल्ल्या जाळून रस्त्यावर आंदोलन केले.
वाळूज (जि.औरंगाबाद) : बजाजनगर येथील भाजी मंडई अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांनी लावलेले लोखंडी बॅरिकेट्स तोडून त्याच्या लाकडी बल्ल्या सोडून जाळून टाकल्या. या प्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व सरकारी कामात अडथळा करून नियम मोडल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी बापाचा विश्वास लेकीने जिंकला, उपसरपंचपदी झाली बिनविरोध निवड
बजाजनगर येथील मोहटा देवी मंदिर लगत असलेल्या भूखंडावर फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. मात्र हा भूखंड एमआयडीसीने विक्री केल्याने तो मोकळा करून देण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अतिक्रमण काढण्यात अडचणी येऊ नये म्हणून पोलिसांनी भाजीमंडईच्या बाजूचे सर्व रस्ते लोखंडी बॅरिकेट्स व लाकडी बल्ल्या लावून बंद केले होते. मात्र हे अतिक्रमण काढण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत बेकायदेशीररित्या जमाव जमवून पोलिसांनी लावलेले लोखंडी बॅरिकेट्स तोडून तसेच लाकडी बल्ल्या जाळून रस्त्यावर आंदोलन केले.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
बेकायदेशीर रित्या जमाव जमवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणीं वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर, गजानन नांदुरकर, राजेंद्र अवतारे, गंगाधर नखाते यांच्यासह दहा ते पंधरा जणांचा महिला व पुरुष यांविरुद्ध विविध कलमांखाली अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन - गणेश पिटेकर