ठरलं तर..! मुख्यमंत्री ठाकरे मराठवाडा दौरा करणार, वाचा असे असेल नियोजन..! 

uddhav tackery.jpg
uddhav tackery.jpg

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादेत आढाव बैठक घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतांना मुख्यमंत्री फिरत नाही अशी टिका केली जात होती. पुण्यानंतर आता ते औरंगाबादेत बैठक घेण्याची शक्यता आहे. 

औरंगाबादेत बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली होती. कॅप्टन म्हणून मुंबईतून कोरोनाची परिस्थिती व त्यासाठी आवश्यक निर्णय उद्धव ठाकरे घेत आहेत, त्यांचे कोरोनाच्या परिस्थितीवर बारकारईने लक्ष असल्याचे सांगितले होते. 

मुख्यमंत्री औरंगाबादेतूनच ते मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा साडेतेरा हजारांच्यावर गेला आहे. 

तर आतापर्यंत या महामारीने ४६४ जणांचे बळी घेतले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्‍सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला होता. या शिवाय कोरोना चाचणी प्रयोग शाळा व चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाचे उद्घघाटन देखील उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीने केले होते. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जानेवारीमध्ये औरंगाबादेत आले होते. मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली होती. तेव्हा बिडकीने येथे पाचशे एकर जागेत फूड पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मराठवाडा दौऱ्यात या फुड पार्कचे भुमीपूजन उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे.

Edited by Pratap Awachar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com