औरंगाबाद शहरावर घोंगावतेय लॉकडाऊनचे संकट; नागरिकांनो, आता तरी जागे व्हा!

Aurangabad Updates
Aurangabad Updates

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गुरुवारी (ता.चार) दिवसभर लॉकडाऊन लागल्याची अफवा पसरली होती. या संदर्भात महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आम्ही कोरोना रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेऊन आहोत. सतत सात दिवस तीनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर शहरात लॉकडाऊन लावला जाईल, असे स्पष्ट केले. औरंगाबाद शहरातील काही भागात लॉकडाऊन लागल्याची अफवा गुरुवारी दिवसभर सुरू होती.

शहरातील विविध भागांची नावे लिहिलेला संदेश सोशल मिडियातून व्हायरल होत होता. लॉकडाऊन खरच लागणार का, लॉकडाऊन लागलाच तर तो केव्हा पासून लागणार, त्याचे स्वरूप काय असेल याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाली. याविषयी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या भागात जास्त गर्दी होते किंवा ज्या भागात करोनाचे जास्त रुग्ण आढळतील तिथे लॉकडाऊन केले जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सलग सात दिवस महापालिकेच्या क्षेत्रात तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले तर लॉकडाऊन लावला जाईल. सात दिवसांनंतर यावर ठोस निर्णय घेऊ, असेही श्री. पांडय यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com