घरातच राहू या. घरात राहणाऱ्या  कष्टकऱ्यांना अन्न पोहोचू या 

photo
photo

औरंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने सुरु असलेल्या संचारबंदीत शहरातील हातगाडीवाले, रिक्षावाले, वाहनचालक, बांधकाम मजूर, कचरा वेचक, सफाई कामगार, घरेलू कामगार, वृत्तपत्र विक्रेते, कंत्राटी कामगार, दुकानातील कामगार, हॉटेल कामगार, सिनेमा कामगार, अशा हजारोंच्या संख्येने शहरात असणाऱ्या कामगार कुटुंबांना मदत करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अँड. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी करण्यात आली आहे. 


समाजाच्या दररोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा हा घटक उपाशी राहू नये, याची काळजी सामाजिक भान बाळगत आपणच घ्यायला हवी, कोरोना पासून वाचण्यासाठी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संचारबंदीत कामगारांची मजुरी बंद झाली आहे. म्हणुनच तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, तिखट, हळद, साबण. सॅनिटायझर, मास्क आदी वस्तू पाकीट बंद करून दानशुरांनी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि गरजुंनीही संपर्क साधा अशी विनंती करण्यात आली आहे. एकही कामगार व त्यांचे कुटुंब उपासमारीचा बळी ठरु नये याची काळजी आपणच घ्यायला हवी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ही सरकारची जबाबदारी 

हातावरचे पोट असणाऱ्या या घटकाची जबाबदारी राज्य शासनाची आहे. केरळ सरकारने मोफत रेशन पुरवणी सुरू केले आहे. तसेच वीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असंघटित कामगारांना संकट काळात दररोज ५०० रुपये भत्ता व मोफत रेशन द्यावे व सर्व झोपडपट्ट्या व इतर भागात पोहोचविण्याची व्यवस्था करावी. तरच आपण कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला करू शकतो. ही जबाबदारी सरकारने स्वीकारल्यावर हा उपक्रम राबविण्याची गरज भासणार नाही. यासाठी आपणही नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टलवर विनंती करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मदतीसाठी येथे साधा संपर्क 

ॲड. अभय टाकसाळ मोबाईल क्र. ९८५०००९६६५), किरणराज पंडित (८४२१८४३१९२), मधुकर खिल्लारे (९८२३११६३२९), 
अमोल सरोदे (७०२०९१६३४६), भालचंद्र चौधरी (९८५०९९०७०७), प्रकाश बनसोडे (८२७५५१३१११), गजानन खंदारे (९५६१६१६१६०), अशोक गजहंस (९८८२१५१०२३०), अशोक वाघ (७८८७३४३४२६), साईनाथ ठेंगडे (९८९००९३८१२) शेख राऊफ (९५७७७७१६२०), राहुल घेवंदे (८४४६३१६९०९), कैलास जाधव (९७६६२२७१४१), रणजीत गायकवाड (९७६२४२२२२१०), निलेश दामोदर (९१४५१३५१४३), जॅक्सन फर्नांडीस (९८२३४३५९०४), विकास गायकवाड (८४२०८११६००), संदीप पेढे (९६६५१४०४५५), प्रवीण घाटविसावे (९१७५४४२२७१), ॲड मिलिंद काकडे (७५८८६४४११४), राजू हिवराळे (९९६००३५३९८), सम्यक जमधडे (८८५६८६६३०१) 


प्रत्येकाने हे नक्की करा 

-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातच राहण्याशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळेच काळजी घेण्याची गरज आहे. 
- वारंवार स्वच्छ हात धुवा 
-तोंडाला, नाकाला वारंवार हात लावू नका 
-अन्न चांगले शिजवून खा 
-गर्दी करू नका, तोंडाला मास्क लावा 
-खोकला सर्दी डोकेदुखी आदी लक्षणे जाणवल्यास तात्काळ घाटी रुग्णालयात तपासणी करून घ्या 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com