esakal | कोरोना लसीकरणासाठी सर्वेक्षण करा शुक्रवारपर्यंत पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांचे पालिका अधिकाऱ्यांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

1937547_coronavirus_vaccine

कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारपर्यंत (ता. एक) सर्व्हेक्षण पूर्ण करा, असे आदेश महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. २८) अधिकाऱ्यांना दिले.

कोरोना लसीकरणासाठी सर्वेक्षण करा शुक्रवारपर्यंत पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांचे पालिका अधिकाऱ्यांना आदेश

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारपर्यंत (ता. एक) सर्व्हेक्षण पूर्ण करा, असे आदेश महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. २८) अधिकाऱ्यांना दिले. कोरोना लसीकरणासंदर्भात श्री. चव्हाण यांनी महापालिकेत आढावा घेतला. वॉर्ड अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी आपआपल्या वॉर्डातील कर्मचारी तसेच शासकीय, खाजगी रुग्णालय आणि छोटे मोठ्या आरोग्य केंद्रात काम करणारे सर्व डॉक्टर्स यांची माहिती गोळा करून शुक्रवारपर्यंत त्यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

लसीकरणासाठी जागेची निवड करताना खोलीला दोन दरवाजे असणे आवश्यक आहे. ज्या केंद्रावर सदरील सुविधा उपलब्ध नसेल तेथे तात्पुरत्या स्वरूपात ही व्यवस्था करावी. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी हे फ्रंट लाईन वर्कर या श्रेणीत येत असून, माहिती जमा करून कोविड ॲपवर अपलोड करण्याची कारवाई त्वरित करावी असे निर्देश श्री. चव्हाण यांनी दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपायुक्त सुमंत मोरे, वॉर्ड अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्याची उपस्थिती होती.


महापालिकेकडून जय्यत तयारी
लसीकरणासाठी महापालिकेची जय्यत तयारी सुरू आहे. झोननिहाय वैद्यकीय नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. झोन निहाय झोनल कार्यदल समितीची स्थापन करण्यात आली आहे. लसीकरणात वॉर्ड अधिकारी आणि नोडल वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख भूमिका असणार आहे.

Edited - Ganesh Pitekar