esakal | निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी, मतभेद दूर करून कामाला लागण्याच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

3congress_297

औरंगाबाद  महापालिका निवडणुकीत जुने मतभेद दूर करून एकजुटीने कामाला लागा. महापालिकेच्या ११५ जागा लढण्याची तयारी करण्याच्या सूचना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. ३१) पदाधिकाऱ्यांना केल्या.

निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी, मतभेद दूर करून कामाला लागण्याच्या सूचना

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जुने मतभेद दूर करून एकजुटीने कामाला लागा. महापालिकेच्या ११५ जागा लढण्याची तयारी करण्याच्या सूचना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. ३१) पदाधिकाऱ्यांना केल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा शहागंज येथील गांधीभवनात घेण्यात आला.

यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार नामदेव पवार, एम. एम. शेख, ॲड. अक्रम खान, विलास औताडे, इब्राहिम पटेल, भाऊसाहेब जगताप, अरुण शिरसाठ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. थोरात यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय राखावा, असे आवाहन केले.


प्रत्येकाच्या जाणून घेतल्या भावना

मेळाव्यापूर्वी श्री. थोरात यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत त्यांनी एकांतात चर्चा केली. शहरात कॉंग्रेसची असलेली ताकद, महापालिका निवडणुकीत काय व्यूहरचना असावी, याविषयी मंथन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.