कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढले, मात्र मृत्युदर चिंताजनकच

03Coronavirus_Outbreak_About_0
03Coronavirus_Outbreak_About_0

औरंगाबाद : शहरात कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आता ९० टक्क्यांवर पोचले आहे. गेल्या चार दिवसांत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक असले तरी मृत्युदर कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता कायमच आहे. शहर व परिसरात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण काही दिवसांपासून घटले आहे.

अँटीजेन टेस्ट सुरू केल्याने आकडा हळूहळू कमी होत गेल्याने ऑगस्टमध्ये दररोज २०० ते ३०० रुग्ण सापडत होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ही संख्या १५० ते २०० पर्यंत आली आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या आणखी कमी आहे. रुग्णवाढीचा आलेख खाली येत असून रुग्ण बरे होण्याचा आलेख उंचावत आहे. शनिवारी (ता.१७) शहरातील कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ९०.५० टक्क्यांवर पोचले. चार दिवसांपूर्वी हे प्रमाण ८८ टक्के होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढल्याने रुग्ण बरे होत आहेत. परिणामी कोविड केअर सेंटरमधील बेड रिकामे झाले आहेत. शहरात १० लाख लोकसंख्येच्या मागे दोन लाख ४३ हजार ४६९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ही संख्या ४५६०० इतकी आहे.


अडीच लाखांवर लोक निगेटिव्ह

शहरात आतापर्यंत दोन लाख ९२ हजार १६३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांपैकी दोन लाख ५३ हजार ३१४ चाचण्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर २६ हजार ८५२ जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. मृत्युदर जैसे थे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात मृत्युदर ३ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मृत्युदराचे प्रमाण हेच आहे. जिल्ह्यात मृत्युदराचे प्रमाण २.९ टक्के आहे, तर राज्यात हे प्रमाण २.८ टक्के इतके आहे. मृत्युदर कमी होत नसल्याबद्दल प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com