esakal | कोरोनामुक्तीसाठी नागरिक म्हणाले, शपथ घेतो की... 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक व नागरिकांना कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ अभियान सुरू केले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ११) नागरिकांना शपथ देण्यात आली. 

कोरोनामुक्तीसाठी नागरिक म्हणाले, शपथ घेतो की... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुक्तीसाठी महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक व नागरिकांना कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ अभियान सुरू केले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ११) नागरिकांना शपथ देण्यात आली. 

प्रशासनामार्फत दिवसरात्र काम करूनदेखील रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ अभियान सोमवारपासून सुरू केले आहे. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी ‘मी आणि माझे कुटुंब लॉकडाउनचे काटेकोर पालन करून, स्वतः घरात राहून इतरांनादेखील घराबाहेर न पडण्याचे आवाहन करेन.

अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास मास्क लावेन, दिवसातून सहा-सातवेळा साबणाने स्वच्छ हात धुवेन, समाजाला कोरोनामुक्त करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांसह शपथ घेत आहे. एकमेकांपासून सहा फूट दूर अंतर राखून जिल्हा कोरोनामुक्त करीन,’ अशी शपथ वाचून दाखविली. खासदार इम्तियाज जलील, आमदार, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, अतुल सावे, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती. 

अनेक वॉर्डांत घेतली शपथ 
शिवसेनेने या मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यानुसार माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून शपथ दिली. मंगळवारी (ता.१२) जनजागृती गीत गायन दिवस म्हणून पाळला जाणार आहे. त्यानुसार अग्रसेन विद्या मंदिर शाळा विटखेडा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

नागरिकांनी घेतली धास्ती 
 रेल्वेस्टेशन रोडवर असलेल्या भगीरथनगरला लागून देवगिरी मुलांचे वसतिगृह येथे महापालिकेने कोरोना संशयित रुग्णांची व्यवस्था केली आहे. वसतिगृह रहिवासी क्षेत्रापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असल्याने ते इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे. 

महापालिकेने शहरात विविध ठिकाणी अलगीकरण-विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. यातील सहा ठिकाणी सौम्य त्रास असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रेल्वेस्टेशन रोडवर देवगिरी मुलांचे वसतिगृह असून, या ठिकणी देखील अनेकांवर उपचार केले जात आहेत; मात्र हे वसतिगृह व भगीरथनगर हे अंतर अवघ्या शंभर फुटांचे आहे. त्यामुळे सुमारे सहाशे ते सातशे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दिलीप रोकडे, पी. डी. सावकारे, एस. बी. डहाके, सुनील मुजुमदार यांच्यासह इतरांच्या निवेदनावर सह्या आहेत.