Corona : आता अंतिम दर्शनही एका फुटावरूनच...

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत राज्य शासनाने नवी नियमावली तयार केली आहे. मृतदेह घरी न नेता रुग्णालयापासून जवळ असलेल्या स्मशानभूमीत न्यावा, नातेवाईकांनी चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास एक फूट अंतरावरून दाखविण्यात यावा, यासह तब्बल ४२ मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 

कोरोना विषाणूमुळे अंत्यसंस्काराचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. एखाद्याचे साध्या आजाराने निधन झाले तरी जवळचे नातेवाईक किंवा गल्लीतील कोणी मदतीला येत नसल्याचे विदारक चित्र गेल्या काही दिवसांपासून पाह्यला मिळत आहे. प्रत्येक अंत्यविधीसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतरच स्मशान परवाना दिला जात आहे. राज्य शासनाने अंत्यविधीच्यावेळी किती जणांनी उपस्थित राहयचे यावर बंधने घातले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाला तर मृतदेहाचे दहन करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने काढले होते. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आले.

दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी (ता. १३) तब्बल ४२ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यापासून ते अंत्यसंस्कार करेपर्यंत व अंत्यसंस्कारानंतर काय काळजी घ्यायची हे नमूद करण्यात आले आहे. मृतदेह रुग्णालयापासून जवळ असलेल्या स्मशानभूमीत न्यावा, नातेवाइकांनी चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास एक फूट अंतरावरून दाखविण्यात यावा, मृतदेहावरील कपडे नष्ट करावेत किंवा जाळून टाकावेत यासह इतर सूचना प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी काढलेल्या आदेशात करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


अशा आहेत प्रमुख सूचना
मृतदेह हाताळताना कर्मचाऱ्याने हात निर्जंतूक करावेत. पीपीई कीटचा वापर करावा. 
मृतदेहाच्या नळ्या व इतर साधने सुरक्षितरीत्या काढावीत. 
उपचार करताना शरीरावर तयार झालेली सर्व छिद्रे सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतूक करावीत. अशा प्रकारे पट्टी लावावी की, त्यातून कुठलीही गळती होणार नाही. 
मृतदेह पाहण्याची कुटुंबाने इच्छा व्यक्त केल्यास योग्य ती खबरदारी घेऊन एका फुटाच्या अंतरावरून दर्शन द्यावे. 
मृत व्यक्तीने वापरलेले कपडे इतर वस्तू, जैविक घातक कचरा पिशवीत टाकावा. तिचा पृष्ठभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतूक करावा. 
नातेवाइकांच्या भावनांचा आदर ठेऊन समुपदेशन करावे. 
मृतदेह ताब्यात देताना एक मीटरच्या अंतरावरून दाखवावा व त्यांनी वैयक्तित संरक्षणात्मक साधने घातलेली असावीत. 
एखाद्या मृत व्यक्तीचे नातेवाईक उपलब्ध नसतील तर मृतदेह शवगृहात ठेवावा. 
मृतदेह बांधण्यासाठी नातेवाइकांची मदत घेऊ नये. 
विलगीकरण कक्षातून मृतदेह देण्यापूर्वी संबंधित पोलिसांना माहिती कळवावी. 
शहगृहातील काही बॉक्स कोविड-१९ साठी राखीव ठेवावेत. 
मृतदेह शवगृहात चार डिग्री सेल्सीअस तापमानात ठेवावा. 
मृतदेह नेणारा चालक व त्याच्या मदतनिसाला प्रशिक्षण द्यावे. 
नातेवाइकांना चेहऱ्याचे अंतिम दर्शन देण्यासाठी मृतदेहावरील प्लॅस्टिक बॅग उघडू नये. 
धार्मिक पाठ-पठण, मंत्र म्हणणे, पवित्र पाणी शिंपडणे यास परवानगी राहिली मात्र दूरूनच. 
मृतदेहाला अंघोळ घालणे, मिठी मारणे, चुंबन घेणे यास प्रतिबंध राहील. 
अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांनी परस्परांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे. 
अंत्यसंस्कारानंतर प्रत्येकाने हात निर्जंतूक करावेत. 
अंत्यसंस्कारच्या वेळी तयार झालेला जैविक कचरा इतरत्र टाकून नेय. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. 
मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीय, नातेवाइकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com