औरंगाबादेत आज ६६ बाधित, जिल्ह्यात ४ हजार १२५ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Monday, 27 July 2020

औरंगाबादेत सकाळच्या सत्रात जिल्ह्यात ६६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४३ व ग्रामीण भागातील २३ रुग्ण आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गट दोन दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे, मात्र अजून काही कालावधीनंतर हे निश्चित होईल. आज (ता. २७) सकाळच्या सत्रात जिल्ह्यात ६६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४३ व ग्रामीण भागातील २३ रुग्ण आहेत. 

 आत्तापर्यंत १३ हजार १०४ जणांना जिल्ह्यात बाधा झाली.  त्यांपैकी ८ हजार ५३६ रुग्ण बरे झाले असून ४४३ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार १२५ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

ग्रामीण भागातील बाधित ४३ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) : संतपूर, कन्नड (१), पाचोड (१), बजाज नगर (१), औरंगाबाद (३), गंगापूर (९), सिल्लोड (६), वैजापूर (२१), पैठण (१)

शहरातील २३ बाधित रुग्ण : गारखेडा (१), चिकलठाणा (१), उल्कानगरी (१), पडेगाव (२), राम नगर (१), एसटी कॉलनी (२) पंचशील नगर (२), नारेगाव (२), कीर्ती सो., एन आठ (१), ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा (१), मुकुंदवाडी (६), जय भवानी नगर (२), एन दोन सिडको (१)

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण    -  ८५३६
उपचार घेणारे       -  ४१२५
आत्तापर्यंतचे मृत्यू  - ४४३
एकूण बाधित        - १३१०४

घाटीतून सोळा रुग्णांना सुटी 
कोरोनाच्या संकटाचा भल्या-भल्यांनी धसका घेतला असताना मात्र तीन महिन्यांच्या बाळाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्याला व इतर पंधरा रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात एकूण बाधित रुग्णांपैकी १२७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. घाटी रुग्णालयातून कोरोनाबाधित १६ रुग्णांना उपचारानंतर आज सुटी देण्यात आली. यात हुसेननगर, बीड बायपास, रामनगर, नारेगाव, वैजापूर, रांजणगाव, पदमपुरा, सौजन्यनगर, बजाजनगर, जयभवानीनगर, सिडको एन-चार, पैठण गेट, हनुमाननगर, बेगमपुरा, गुलाबवाडी, नारेगाव, गांधीनगर या भागांतील रुग्णांचा समावेश आहे. तसेच जळगाव, चाळीसगाव येथील रुग्णांनाही सुटी झाली. आतापर्यंत घाटीतून ६८७ कोविड रुग्णांना सुटी देण्यात आली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 

दिवसभरात अडीच हजारांवर ‘अँटीजेन टेस्ट’ 
महापालिकेने कोरोनाच्या अँटीजेन, आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. रविवारी (ता.२६) शहराच्या विविध भागांत मोबाईल पथके आणि सहा चेकपोस्टवर २६७१ अँटीजेन, आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी २५८६ अँटीजेन टेस्टमधून ७२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad