Corona : औरंगााबादेत हा आकडा गेला तब्बल लाखावर 

माधव इतबारे
Thursday, 30 July 2020

शहरात एक लाख १४ हजार ६४० कोरोना चाचण्या झाल्या. त्यातून १०,२६२ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर तब्बल एक लाख दोन हजार ४९१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. 

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यानंतर एक लाख चाचण्या घेणारे औरंगाबाद शहर तिसऱ्या क्रमांवर आहे. आत्तापर्यंत एक लाख १४ हजार संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील एक लाख दोन हजार ४९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे आरटीपीसीआर पद्धतीने बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅब घेतले होते. मात्र या चाचण्यांचे अहवाल २४ तासानंतर येत असल्याने मर्यादा पडत होत्या. दरम्यान आरटीपीसीआर पद्धतीच्या कीट उपलब्ध होताच राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला या कीटचा वापर करण्याच्या सूचना केल्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

सुरुवातीला राज्य शासनाने पाच हजार कीट दिल्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एक लाख कीट खरेदी करून १० जुलैपासून शहरात अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टची मोहीम राबवण्यासाठी फिरती पथके, मोबाइल टीम, सहा एन्ट्री पॉइंट अशी ३९ पथके तैनात केली. त्यामुळे प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे राज्यात सर्वाधिक सुमारे ८९ हजार कोरोना चाचण्या करण्याचा विक्रम महापालिकेने केला. आत्तापर्यंत शहरात एक लाख १४ हजार ६४० कोरोना चाचण्या झाल्या. त्यातून १०,२६२ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर तब्बल एक लाख दोन हजार ४९१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. 

मृत्युदर पुन्हा वाढला 
शहरातील मृत्यूदरावरून देखील चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पाच टक्क्यांपेक्षा जास्त असलेला मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र बुधवारी (ता. २९) प्राप्त झालेल्या अहवालानुसार मृत्युदर पुन्हा चार टक्क्यांच्या वर गेला आहे. मृत्युदर ४.०७ टक्के एवढा नोंदविला गेला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

चाचण्यांची घटली संख्या, दिवसभरात ९० पॉझिटिव्ह 
शहराच्या विविध भागांत महापालिकेचे मोबाईल पथके आणि सहा एन्ट्रीपॉइंटवर २८९४ अॅन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. २७५१ अॅन्टीजेन चाचण्यांतून ९० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. शहरात कोरोनाचा पैâलाव झपाट्याने होत असल्यामुळे बाधितांची संख्यादेखील झपाट्याने वाढतच चालली आहे. सात ते सायंकाळी सात या वेळेत सहा एण्ट्री पॉइंटवर एक हजार ३१० जणांच्या अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३३ जण पॉझिटिव्ह निघाले. पाच जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये १३८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार ४४१ जणांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५७ जण पॉझिटिव्ह निघाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad