कोरोनामुळे यंदाचा स्तनपान सप्ताह डिजिटलच 

मधुकर कांबळे  
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

बाळाला आईचे पहिल्या काही वेळातच मिळणारे दूध म्हणजे त्याचे पहिले लसीकरण असते. या दुधातून बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

औरंगाबाद : बाळाला जन्मल्याबरोबर शक्य तितक्या लवकर स्तनपान करणे म्हणजे त्याला अमृतपान केल्यासारखेच असते, एवढे स्तनपानाचे महत्त्व आहे; मात्र यंदा स्तनपान सप्ताह कोरोनामुळे डिजिटलच होणार आहे. 

दरवर्षी एक ऑगस्टपासून स्तनपान सप्ताहाचे आयोजन केले जाते. याचे महत्त्व पटविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून ग्रामीण भागात या सप्ताहाद्वारे जनजागृती करण्यात येते; परंतु यावर्षी ग्रामीण भागात कोरोनाची साथ शहरी भागाप्रमाणे वाढलेली आहे. त्यात अंगणवाडी सेविका कोरोनाच्या सर्व्हेच्या कामात गुंतलेल्या आहेत. कोरोना रोखणे सध्या प्राधान्यक्रमाचा विषय असल्याने यंदाचा सप्ताह डिजिटल स्वरूपातच साजरा होणार आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अंगणवाडी सेविकांचे व गर्भवती आणि स्तनदा मातांचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या व्हॉट्‌सॲपवर स्तनपानाचे महत्त्व पटवून देणारे फोटो, व्हिडिओ, माहिती पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले, की बाळाला आईचे पहिल्या काही वेळातच मिळणारे दूध म्हणजे त्याचे पहिले लसीकरण असते. या दुधातून बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. बाळाच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक वाढीसाठी सहा महिने त्याला स्तनपान करणे अतिआवश्‍यक आहे. यासाठी बाळचा जन्म झाल्याबरोबर शक्य तितक्या लवकरात लवकर दूध पाजणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Made This Year's Breastfeeding Week Digital Aurangabad