esakal | त्या परिचारकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

महापालिकेने तो परिचारक राहत असलेला पडेगावचा परिसर सील केला आहे. तसेच या परिचारकाच्या घाटी व संबंधित वॉर्डांत संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. आत्तापर्यंत २० जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

त्या परिचारकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : घाटी रूग्णालयातील परिचारकाला (ब्रदर) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सोमवारी (ता. सहा) दिवसभर या परिचारकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्या त्याच्या संपर्कात आलेल्या २० जणांच्या लाळेचे नमुने (स्बॅब) घेऊन त्यांना आयसोलेटेड केले आहे. तो वास्तव्यास असलेला पडेगावचा परिसर सील करण्यात आला आहे. 

महापौर नंदकुमार घोडेले व महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, रविवारी (ता. पाच) शहरात सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या १० वर गेली होती. त्यात मंगळवारी आणखी एका रुग्णाची भर पडली व आकडा ११ वर गेला. सध्या नऊ रुग्णांवर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घाटी प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिकेने तो परिचारक राहत असलेला पडेगावचा परिसर सील केला आहे. तसेच या परिचारकाच्या घाटी व संबंधित वॉर्डांत संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. आत्तापर्यंत २० जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. हा परिचारक कुठे बाहेर वा गावी गेलेला नसून घाटीतील ओपीडी विभाग किंवा घाटीत इतरत्र फिरताना त्याला कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज डॉ. पाडळकर यांनी व्यक्त केला. 

त्यांची प्रकृती स्थिर 
सध्या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात एन-चार व आरेफ कॉलनीत आढळलेले दोन रूग्ण, तसेच रविवारी (ता. पाच) आढळलेल्या सिडको एन-चार येथील एक, सातारा परिसर एक, देवळाई परिसरातील एक, जलाल कॉलनी येथील दोन, रोषण गेट परिसरातील एक आणि पदमपुरा येथील एकाचा समावेश आहे. तसेच घाटीतील परिचारक अशा सर्व रुग्णांवर घाटी व जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. पाडळकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले
 
तीन हजार घरांची तपासणी 
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले तिथे आतापर्यंत महापालिकेतर्फे सुमारे तीन हजार घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. येथील नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला असून, त्यांच्यावर आता १४ दिवस निगराणी ठेवली जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 
 
वसाहतींभोवती पोलीसही तैनात 
सील केलेल्या सिडको एन-चार, आरेफ कॉलनी, पदमपुरा, रोषण गेट, जलाल कॉलनी, सातारा-देवळाई, पडेगाव या भागातून कोणीही नागरिक घराबाहेर पडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा