सर्दी, ताप, खोकला असेल या ठिकाणी करा तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

महापालिकेने आयएमए व इतर खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने शहरात  १२ ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत. सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या क्लिनिकची पाहणी केली. 

औरंगाबाद : कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यास खासगी दवाखान्यात टाळाटाळ होत असल्याने महापालिकेने आयएमए व इतर खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने शहरात  १२ ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत. सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या क्लिनिकची पाहणी केली. 

ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही खासगी रुग्णालयांनादेखील भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बारा ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात आयएमएतर्फे सहा, महापालिकेचे चार तर एमजीएम व धूत हॉस्पिटलमध्ये एक क्लिनिक असेल. सोमवारी १२ क्लिनिक सुरू करण्यात आले. या ठिकाणी सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

 

या तपासणीनंतर ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील त्यांना क्विक केअर सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. क्विक केअर सेंटरसाठी समाजकल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये ३००, तर एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये शंभर खाटांची व्यवस्था झाली आहे. पदमपुरा येथील महापालिकेच्या सेंटरमध्ये साठ खाटांची, एमआयटी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये १५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ६१० बेडची व्यवस्था या सर्व ठिकाणी आहे. तसेत क्विक केअर सेंटरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती केले जाणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात २२०, एमजीएममध्ये ३००, धूत हॉस्पिटलमध्ये २०० आणि घाटी रुग्णालयात २५० बेडची व्यवस्था करण्यात आली, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

या ठिकाणी होणार तपासणी 
समाजकल्याण हॉस्टेल, किलेअर्क 
एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, सिडको एन-सहा 
अग्निशमन विभागाची इमारत, पदमपुरा 
एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल, बीड बायपास 
आयएमए मिनी हॉल, समर्थनगर 
आयएमए कम्युनिटी सेंटर आयएमए 
महापालिका शाळा, गारखेडा 
महापालिका शाळा, भडकल गेट 
महापालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स, टीव्ही सेंटर 
महापालिका शाळा, कांचनवाडी 
एमजीएम कॉलेज व हॉस्पिटल 
धूत हॉस्पिटल, जालना रोड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad