अर्धा तास आधी केंद्रावर येऊनही कोरोनाबाधित मतदानापासून वंचित, औरंगाबादेतील प्रकार! 

अतुल पाटील
Tuesday, 1 December 2020

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कोरोनाबाधित उमेदवारांसाठी सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान वेळ दिला होता मात्र, औरंगाबादेतील तेरणा प्राथमिक विद्यामंदीर येथील केंद्रावर मतदानाची वेळ संपायच्या आधी पाऊन येऊनही एका कोरोनाबाधिताला मतदानाचा हक्क नाकारला. विशेष म्हणजे हे कोरोनाबाधित वयस्क आणि गंभीर आजारी होते.

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कोरोनाबाधित उमेदवारांसाठी सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान वेळ दिला होता मात्र, औरंगाबादेतील तेरणा प्राथमिक विद्यामंदीर येथील केंद्रावर मतदानाची वेळ संपायच्या आधी पाऊन येऊनही एका कोरोनाबाधिताला मतदानाचा हक्क नाकारला. विशेष म्हणजे हे कोरोनाबाधित वयस्क आणि गंभीर आजारी होते.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हा सामान्य रुग्नालयातून चार कोरोनाबाधित घेऊन एक अॅम्ब्ल्युन्स  दुपारी चार वाजता सिडको एन-पाच येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात आली होती. त्याठिकाणी दोन जणांनी मतदान केले. कोरोनाबाधित आल्यानंतर इतर मतदारांना थांबवून केंद्रप्रमुखांनी कोरोनाबाधितांचे मतदान करुन घेतले. त्यानंतर एक जणाचे मतदान सिडको एन सहा येथील तेरणा प्राथमिक विद्यामंदीर येथे मतदान होते. त्यावेळी दुपारचे साडेचार वाजले होते. मात्र, तिथे कोरोनाबाधितांना घेऊन आल्याचे समजताच अनेक जणांनी मतदान केंद्रावरुन काढता पाय घेतला. यावेळी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी ‘‘वेळ संपायच्या वेळेस या,’’ असे सांगून परत पाठवले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अॅम्ब्युलन्स मधील चौथ्या व्यक्तीचे मतदान सिडको एन-सात येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर याठिकाणी होते. तिथे पावणेपाच वाजता पोचले होते. इतर मतदारांचे मतदान होईपर्यंत पंधरा मिनिटे त्यांना बाहेर थांबवण्यात आहे. त्याठिकाणी मतदान झाल्यानंतर पाच वाजून दहा मिनिटांनी एका मतदारासाठी अॅम्ब्ल्युन्स पुन्हा तेरणा प्राथमिक विद्यामंदीर येथे आली. मात्र, त्या कोरोनाबाधिताला आत घेण्यास पोलिसांनी नकार दिला. यावेळी केंद्रप्रमुखांना बाहेर येण्यासाठी निरोप पाठवला. त्यांनीही भेटण्यास नकार दिला. त्यामुळे एका कोरोनाबाधिताला मतदानापासून वंचित रहाव लागले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन तास पीपीई कीटमध्येच
साडेतीन पासून साडेपाच वाजेपर्यंत चार कोरोनाबाधित पीपीई कीटमध्येच होते. त्यात अॅमब्ल्युन्सचे दारे बंद असल्‍याने कोंदटल्यासारखे वातावरण होते. पण मतदान करायच्या जिद्दीने त्यांनी हा त्रास सहन केला. चारपैकी तिघांचे मतदान झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यातील एक जणाला मतदान करता आले नसल्याने त्यांनी त्रागा व्यक्त केला. कोरोनाबाधितांसोबत डॉ. अजय कांबळे, प्रविण भिवसाने यांची उपस्थिती होती.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient abstained from voting