धक्कादायक ! औरंगाबादेत आज या भागात आढळले नवे रुग्ण

मनोज साखरे
Friday, 29 May 2020

 दोन दिवसातच ९१ रुग्ण वाढल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४५३ झाली आहे. यापैकी ९०१ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

औंरगाबाद ः मागील सहा दिवसांपासून औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत होती. मात्र, मागच्या दोन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाची समस्या वाढली आहे. काल गुरुवारी (ता.२८) ४५ रुग्ण आढळून आले होते.

त्यानंतर शुक्रवारी (ता. २९) सकाळी ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या दोन दिवसातच ९१ रुग्ण वाढल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४५३ झाली आहे. यापैकी ९०१ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्ण 
(कंसात रुग्ण संख्या) -
शुक्रवारी वाढलेले ४६ रुग्ण ः

नेहरू नगर, कटकट गेट (१), कैलास नगर, माळी गल्ली (१), एन सहा सिडको (१), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (१), कैलास नगर (२), श्रीनिकेतन कॉलनी (१), खडकेश्वर (१), उस्मानपुरा (१), खंडोबा मंदिर, सातारा गाव (२), इटखेडा (३), उस्मानपुरा (३), जुना बाजार (१), विश्रांती कॉलनी एन २ (३), नारळी बाग गल्ली नं.२ (१), राशेदपुरा, गणेश कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.१ (१), बायजीपुरा गल्ली नं.२ (१), एन ४ विवेकानंद नगर,सिडको (१), शिवाजी नगर (१), एन सहा संभाजी कॉलनी (१), गजानन नगर एन ११ हडको (५), भवानी नगर, जुना मोंढा (१), जुना बायजीपुरा (२), किराडपुरा (१), रोशनगेट (१), राशीदपुरा (१), मोतीवाला नगर (१), दौलताबाद (२), वाळूज सिडको (२), राम नगर, कन्नड (२)  या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये  १४ महिला आणि ३२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.                                             
 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

आतापर्यंत ९०१ जण कोरोनामुक्त
घाटीतुन चार, जिल्हा रुग्णालयातून ११ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालये येथून आतापर्यंत एकूण ९०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले.    
---
कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण            - ९०१
उपचार घेणारे रुग्ण        - ४८४
एकूण मृत्यू                   - ६८
-------------------------------------------
जिल्ह्यातील एकूण रुग्ण -  १४५३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Updates Increase in the Number of Corona Patients Aurangabad